Russia Ukraine Crisis : रशिया-युक्रेन युद्धामुळे अख्ख जग चिंतातूर आहे. नव्या जागतिक संकटाची नांदी देणाºया या युद्धावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत साऱ्यांनीच चिंता व्यक्त केली आहे. एकीकडे प्रियंका चोप्रा,सोनू सूदपासून अनेक सेलिब्रिटींनी युक्रेनला,तिथे फसलेल्या भारतीयांना मदतीचं आवाहन केलं तर दुसरीकडे अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi ) याने या युद्धावर मीम शेअर केलं. मग काय, अर्शद नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. लोकांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं. लोक संतापलेले पाहून अर्शदनं मीम लगेच डिलीट केलं. पण तोपर्यंत त्याचं मीम व्हायरल झालं होतं.
अर्शदने ‘गोलमाल’च्या धर्तीवर हे मीम शेअर केलं होतं. या मीममध्ये त्याने शर्मन जोशीला अमेरिका, स्वत: युक्रेन, अजय देवगण जर्मनी, तुषार कपूर फ्रान्स आणि गुंड हे रशिया असल्याचं दाखवलं होतं. गोलमालचा एक सीन मीममध्ये दाखवला होता. यात अर्शद वारसी रिमीवर लट्टू होत, तिच्याकडे वळतो आणि इकर्ड कर्ज मागणारे गुंड आलेले पाहून अजय देवगण व शर्मन जोशी तिथून पळ काढतात. मग काय शर्मन एकटात गुंडांच्या तावडीत सापडतो. आपल्यासारखीच युक्रेनची स्थिती झालीये, असं सांगण्याचा प्रयत्न अर्शदने या मीममधून केला. पण हे मीम पाहून लोक भडकले.