सुशांतबरोबरच्या डेटींगची अफवा कृतीने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 18:08 IST
अभिनेत्री कृती सेननने सुशांत सिंग राजपूतसोबत डेटींग करीत असल्याची अफवा ट्विट करुन फेटाळली आहे. कृतीने ही अफवा चुकीची आणि ...
सुशांतबरोबरच्या डेटींगची अफवा कृतीने फेटाळली
अभिनेत्री कृती सेननने सुशांत सिंग राजपूतसोबत डेटींग करीत असल्याची अफवा ट्विट करुन फेटाळली आहे. कृतीने ही अफवा चुकीची आणि आधारहीन असल्याचे म्हटले आहे. }}}}सहा वर्षापासून मैत्रीण असलेल्या अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतने मे महिन्यात आपले ब्रेकअप झाल्याचे ट्विट केले होते. नंतर त्याने ते काढून टाकले होते.सुशांतने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते, ती दारु पित नव्हती की मी महिलांच्या मागे होतो. ही दुर्दैवी गोष्ट आहे.’राब्ता या चित्रपटात कृती सेनन (२५) आणि सुशांतसिंग राजपूत (३०) ही जोडी एकत्र आली आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोनने आयटम साँगही केले आहे. २०१७ मध्ये हा चित्रपट येईल अशी अपेक्षा आहे.