Join us

रजनीकांतच्या प्रकृतीबाबत अफवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 18:25 IST

तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत गुरुवारी अफवांचा बाजार होता. रजनीकांत यांनी आपली प्रकृती चांगली असल्याचे कळविले आहे. सध्या रजनीकांत ...

तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत गुरुवारी अफवांचा बाजार होता. रजनीकांत यांनी आपली प्रकृती चांगली असल्याचे कळविले आहे. सध्या रजनीकांत हे अमेरिकेत आहेत.रजनीकांत यांच्या निकटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘रजनीकांत हे सध्या अमेरिकेत आराम करीत आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका. सध्या अमेरिकेत रात्र आहे, मात्र रजनीकांत काही वेळानंतर ट्विटरद्वारे आपली माहिती कळवतील. कोणत्या तरी आॅनलाईन पोर्टलवर त्यांच्या प्रकृतीबाबत चुकीची बातमी प्रसारित करण्यात आली आहे.’रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांमुळे त्यांचे चाहते चिंतीत आहेत. सोशल मिडीयावर त्यांच्या प्रकृतीची माहिती विचारणाºयांची संख्या वाढली आहे. ६५ वर्षीय रजनीकांत यांनी नुकतेच ‘कबाली’ची शुटींग पूर्ण केली आहे. दिग्दर्शक शंकर यांचे ‘२.०’ चे शुटींगही लवकरच सुरू होईल.