'या' चित्रपटासाठी गुजराती शिकतेय कृती खरबंदा, बॉबी देओलसोबत करणार रोन्मास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 11:12 IST
धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या यमला पगला दीवाना...फिर से' चे शूटिंग संपले आहे. काही दिवसांपूर्वी 'यमला पगला दीवाना : ...
'या' चित्रपटासाठी गुजराती शिकतेय कृती खरबंदा, बॉबी देओलसोबत करणार रोन्मास
धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या यमला पगला दीवाना...फिर से' चे शूटिंग संपले आहे. काही दिवसांपूर्वी 'यमला पगला दीवाना : फिर से'मधल्या धर्मेंद्र यांचा लुक आऊट झाला आहे. यात धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओलशिवाय कृती खरबंदासुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर कृती खरबंदाने सांगितले की, 'यमला पगला दीवाना फिर से'मध्ये ती एका गुजराती मुलीची भूमिका साकारणार आहे. जी माझ्यासाठी खूपच चॅलेंजिंग आहे कारण मला गुजराती भाषा येत नाही. त्यामुळे ती शिकण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली आहे. कृती पुढे म्हणाली, 'यमला पगला दीवाना फिर से' हा चित्रपट माझ्यासाठी खास आहे. या चित्रपटासाठी मी विशेष मेहनत घेतली आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडले. या चित्रपटात कृतीची जोडी बॉबीसोबत जमणार आहे. याचित्रपटात सलमान खानदेखील कॅमिओ करणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन पंजाबी फिल्ममेकर नवनीत सिंग करतो आहे. तर प्रोडक्शनची जबाबदारी सनी देओल संभाळतो आहे. अजून चित्रपटाची रिलीज डेट कळलेली नाही. ‘यमला पगला दीवाना फिर से’ चित्रपटाची कथा धीरज रतनच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटाची थीम पहिल्या दोन्ही चित्रपटांपेक्षा वेगळी आहे. धीरज रतन यांनी नुकतेच ‘कप्तान, सरदारजी-२, अंबरसरिया, शरीक, सरदारजी’ या पंजाबी चित्रपटांची कथा लिहिली आहे. काही दिवसांपूर्वी कृती चित्रपट 'शादी में जरुर आना'मध्ये दिसली होती. याचित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. या चित्रपटात तिच्या अपोझिट राजकुमार रावहि दिसला होता. विनोद बच्चन आणि सौंदर्या प्रॉडक्शनद्वारा या चित्रपटाची निर्मिती केली होती. रत्ना सिन्हाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. कमल पांडे यांनी याची पटकथा लिहिली होती. कृतीने तेलुगू चित्रपटातून आपल्या करिअची सुरुवात केली होती. तसेच ‘गेस्ट इन लंडन' या चित्रपटात सुद्धा ती दिसली होती. यात तिने अनाया पटेल नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी आपली कमला दाखवू शकला नव्हता.