Join us

RRR फेम 'राम'च्या मनगटावरील घड्याळ्याची किंमत वाचून येईल तुम्हाला भोवळ, त्या किमतीत येईल आलिशान घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 18:23 IST

Ram Charan : राम चरण नेट वर्थच्या कलेक्शनमध्ये एक नव्हे तर अनेक घड्याळांचा समावेश आहे, ज्यापैकी बहुतेक घडाळ्यांची किंमत कोटीच्या घरात आहे.

साऊथ सुपरस्टार राम चरण (Ram Charan) चित्रपटांमधील अभिनयासोबतच महागड्या आणि लग्झरी जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. RRR च्या 'राम'कडे महागडी वाहने, खाजगी जेट, आलिशान राजवाडे तसेच अनेक मौल्यवान वस्तू आहेत. पण आज आम्ही तुम्हाला त्याच्या करोडो किमतीच्या घड्याळाबद्दल सांगणार आहोत. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम चरण नेट वर्थच्या कलेक्शनमध्ये एक नव्हे तर अनेक घड्याळांचा समावेश आहे, ज्यापैकी बहुतेकांची किंमत करोडो रुपये आहे. अलीकडेच राम चरणने राणा दग्गुबतीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने घातलेले घड्याळ सुमारे २ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. तर राम चरणकडे रिचर्ड मिले आरएम ६१-०१ जोहान ब्लॅक घड्याळ आहे. रिपोर्ट्सनुसार, या घड्याळाची किंमत ३ कोटी रुपये असल्याचे बोलले जाते.

राम चरणच्या घड्याळांचा संग्रह इथेच संपत नाही. करोडो किमतीच्या घड्याळ्यांव्यतिरिक्त, अभिनेत्याकडे Nike लिमिटेड एडिशन ग्रेफुल डेड एसबी डंक लो शॉर्ट्स देखील आहेत. ज्याची किंमत सुमारे १.६ लाख रुपये आहे.

साऊथचा सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना लग्नाच्या १० वर्षानंतर आई-वडील होणार आहेत. अलीकडेच, अभिनेत्याने सोशल मीडियावर चाहत्यांना त्यांच्या घरी येणार्‍या आनंदाबद्दल सांगितले होते. या वर्षी रिलीज झालेला राम चरणचा 'RRR' चित्रपट देशात धमाकेदार कमाई केल्यानंतर आता परदेशातही धुमाकूळ घालत आहे.

टॅग्स :राम चरण तेजा