Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोनित रॉयने मुंबईत खरेदी केला आलिशान फ्लॅट अन् चार पार्किंग, मोजले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 10:45 IST

रोनित रॉय यांनी नुकतंच मुंबईत लक्झरी अपार्टमेंट खरेदी केलं आहे. मुंबईतील वर्सोवा येथे त्यांनी आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.

रोनित रॉय हे कलाविश्वातील लोकप्रिय नाव आहे. अनेक मालिक आणि सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. 'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'इतना करो ना मुझे प्यार', 'अदालत', 'बंदिनी' अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी कमा केलं आहे. त्याबरोबरच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही ते महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले. त्यांचा चाहता वर्ग मोठा असून ते सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

'टाइम्स नाऊ'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, रोनित रॉय यांनी नुकतंच मुंबईत लक्झरी अपार्टमेंट खरेदी केलं आहे. मुंबईतील वर्सोवा येथे त्यांनी आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. ४२५९ स्केअर फूट परिसरात हा फ्लॅट पसरला आहे. या फ्लॅटची किंमत सुमारे १८.३४ कोटी इतकी आहे. रोनित यांनी फ्लॅट खरेदी केलेल्या या बिल्डिंगमध्ये स्विमिंग पूल, जीम अशा अनेक सुविधाही आहे. त्यांचा हा आलिशान फ्लॅट २०व्या मजल्यावर आहे. या फ्लॅटबरोबरच त्यांनी ४ पार्किंग स्लॉटदेखील खरेदी केले आहेत. 

रोनित रॉय यांनी २००३ मध्ये नीलम सिंगशी विवाह करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यांना दोन मुलं आहेत. 'क्योंकी सास भी कभी बहु थी' मालिकेतील भूमिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. 'स्टुडंट ऑफ द इयर', 'टू स्टेटस', 'लायगर', 'शहजादा', 'बडे़ मियाँ छोटे मियाँ' अशा सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.  

टॅग्स :रोनित रॉयसेलिब्रिटी