Join us

वयाने दुप्पट असलेल्या अभिनेत्याबरोबर रोमान्स करणार बिग बॉसची ‘ही’ एक्स स्पर्धक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 21:16 IST

बिग बॉस या वादग्रस्त शोची एक्स स्पर्धक दिगांगना सूर्यवंशी लवकरच अभिनेता गोविंदा याच्याबरोबर एका चित्रपटात झळकणार आहे. दिगांगना वीस ...

बिग बॉस या वादग्रस्त शोची एक्स स्पर्धक दिगांगना सूर्यवंशी लवकरच अभिनेता गोविंदा याच्याबरोबर एका चित्रपटात झळकणार आहे. दिगांगना वीस वर्षांची असून, गोविंदाचे वय जवळपास ५३ वर्षे इतके आहे. म्हणजेच दिगांगनाच्या तुलनेत गोविंदाचे वय दुप्पट आहे. दोघांच्या या चित्रपटाचे ‘फ्राय डे’ असे नाव असून, त्यात दिगांगना गोविंदासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग दिल्ली येथे सुरू आहे. दिगांगना आणि गोविंदाव्यतिरिक्त वरुण शर्माचीही चित्रपटात प्रमुख भूमिका असून, हा एक कॉमेडीपट आहे. दिगांगनाने बºयाचशा टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र तिला ‘एक वीर की अरदास : वीरा’ या मालिकेने खºया अर्थाने ओळख मिळवून दिली. दिगांगना अभिनेत्री असण्याबरोबरच एक रायटर आणि सिंगर आहे.'Nixie' आणि 'The Power Of Love' या दोन कादंबºया तिने लिहिल्या आहेत. टीव्ही मालिकांविषयी सांगायचे झाल्यास तिने ‘एक वीर की अरदास : वीरा’ या मालिकेसह ‘हकीकत, कृष्णा अर्जुन, शकुंतला, बालिका वधू, रूक जाना नही, कुबूल है, बॉक्स क्रिकेट लीग, बिग बॉस, बॉक्स क्रिकेट लीग-२’ आदी शोमध्ये काम केले आहे. दिगांगनाने याचवर्षी जुलै महिन्यात थ्री बीएचकेचे घर खरेदी केले, ज्याची किंमत जवळपास दोन कोटी रुपये आहे. या नव्या घरात दिगांगना तिच्या आईवडिलांसमवेत राहते. गोविंदाविषयी सांगायचे झाल्यास तो २००८ मध्ये आलेल्या ‘मनी है तो हनी है’ मध्ये हंसिका मोटवानी हिच्यासोबत रोमान्स करताना दिसला. हंसिका आणि गोविंदाच्या वयात जवळपास २० ते २२ वर्षांचे अंतर आहे. रिपोर्ट्सनुसार, गोविंदाचा यावर्षी ‘आ गया हिरो’ हा चित्रपट रिलीज झाला होता. परंतु बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाला फारसा करिष्मा दाखविता आला नाही. सध्या गोविंदा या चित्रपटाव्यतिरिक्त ‘राज माइंड ब्लोइंग’ आणि ‘भगवान के लिए मुझे छोड दो’ या चित्रपटांवरही काम करीत आहे.