Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेबोला सोडावी लागली राजकुमारीची भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 11:16 IST

 आई होण्याएवढी दुसरी आनंदाची गोष्ट ती कोणती असेल? हीच भावना सध्या करिना कपूर खान अनुभवत आहे. ती गरोदर असल्याची ...

 आई होण्याएवढी दुसरी आनंदाची गोष्ट ती कोणती असेल? हीच भावना सध्या करिना कपूर खान अनुभवत आहे. ती गरोदर असल्याची बातमी सैफने सोशल मीडियावर शेअर केली. आणि तिच्या सर्व चाहत्यांमध्ये आनंदाची एकच लाट उसळली.शशांक घोष यांच्या ‘वीरे दी वेडिंग’ला तिने ग्रीन सिग्नल दिला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. कारण, रिभू दासगुप्ता यांचा थ्रिलर तसेच रोहित शेट्टी यांचा ‘गोलमाल ४’ साठी ती निर्मात्यांना पर्यंत थांबवू शकत नाही.तसेच तिने रानी रत्नावती यांच्या राजस्थानी राजकुमारीच्या भूमिकेसाठी चित्रपटाला नाकारले आहे. यासाठी आता सोनाक्षी सिन्हा हिला घ्यायचे ठरले आहे. गरोदर असल्यामुळे तिने काही चित्रपट नाकारलेही असतील पण, मॅगझीन कव्हर्स, ब्रँडेड शूटींग, ‘वीरे दी वेडिंग’ यात ती सध्या बिझी आहेच.