Join us

फवादची भूमिका सलमानसारखीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 09:12 IST

 फवाद खान नुकताच करण जोहर यांच्या ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ चित्रपटांत उत्तम अभिनयासह दिसला. त्याच्या भूमिकेचे खुप कौतुक झाले. करण ...

 फवाद खान नुकताच करण जोहर यांच्या ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ चित्रपटांत उत्तम अभिनयासह दिसला. त्याच्या भूमिकेचे खुप कौतुक झाले. करण जोहरचा आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’ यात फवादची भूमिका पाहुण्या कलाकारापेक्षा थोडी जास्त आहे.‘कुछ कुछ होता है’ मधील सलमान खानची भूमिका जशी आहे त्याच्याशी थोडीशी साम्य असलेली आहे. गेस्ट अ‍ॅपियरन्स नसून मुख्य भूमिकेला सहाय्यक भूमिका आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना त्याने सांगितले की, ‘ त्याचा अभिनय कुछ कुछ होता है मधील सलमान खानसारखा आहे. पण, तो फक्त पाहुण्या कलाकाराच्या रूपातही दिसणार नाही.त्याची भूमिका ही सहाय्यक भूमिकेसारखी असणार आहे.’ फवाद आणि करण जोहर हे खुप चांगले मित्र असून ‘ऐ दिल है मुश्किल’ मध्ये त्याला घेतल्याने खुप मोठा ब्रेक त्याला मिळाला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या रॉय बच्चन देखील दिसणार आहे.