बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्याला एमएस धोनी या चित्रपटात साकारायची होती धोनीची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 12:44 IST
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या ...
बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्याला एमएस धोनी या चित्रपटात साकारायची होती धोनीची भूमिका
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिकने बॉक्स आॅफिसवर चांगलीच धूम उडवून दिली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तसेच या चित्रपटाचे, चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी दोघांनी देखील चांगलेच कौतुक केले होते. या चित्रपटात सुशांत सिंग रजपूतने महेंद्र सिंग धोनीची भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाची प्रेक्षकांनी चांगलीच स्तुती केली होती. पण तुम्हाला माहीत आहे का, एमएस धोनी द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटात काम करण्याची बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याची इच्छा होती. एमएस धोनी द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटात काम करण्याची बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारची प्रचंड इच्छा होती. पण तो या भूमिकेसाठी योग्य नसल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे यांचे म्हणणे होते आणि त्यामुळेच त्यांनी या चित्रपटासाठी अक्षय कुमारचा नव्हे तर सुशांत सिंग रजपूतचा विचार केला आणि सुशांतने त्याला मिळालेल्या भूमिकेचे सोने केले. ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनीच्या आयुष्यातील विविध पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. एका सामान्य कुटुंबातील महेंद्रसिंगचा भारतीय क्रिकेट संघात समावेश कशाप्रकारे झाला. यासाठी धोनीला किती मेहनत घ्यावी लागली यांसारख्या गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात आल्या होत्या. तसेच धोनीच्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टी देखील या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या समोर आल्या. धोनीचे लग्न साक्षीसोबत झाले आहे हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. पण धोनीने क्रिकेटच्या क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली होती. मात्र तिचे एका अपघातात निधन झाले. या धोनीविषयी माहीत नसलेल्या अनेक गोष्टी त्याच्या फॅन्सना या चित्रपटामुळे जाणता आल्या होत्या. या चित्रपटात सुशांतसोबतच कायरा अडवाणी, दिशा पटाणी, अनुपम खेर, भूमिका चावला यांच्या मुख्य भूमिका होत्या. आतापर्यंत क्रिकेट या विषयावर आधारित असलेल्या चित्रपटांमध्ये धोनीची बायोपिक कमाईच्या बाबतीत आघाडीवर आहे.Also Read : या चित्रपटातील गाण्यासाठी देसी लूकमध्ये शूट करतोय अक्षय कुमार