गेल्या काही दिवसापूर्वी सुश्मिता सेन व रोहमन शॉल यांचे ब्रेकअप झाल्याचं वृत्त आलं होतं. या गोष्टीला दुजोरा मिळाला तो रोहमनने रिलेशनशीपला घेऊन काही पोस्ट इंस्टा स्टोरीवर केल्या होत्या. ब्रेकअपच्या वृत्तावर रोहमनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. रोहमनच्या या पोस्टमधून समजतंय की सुश्मिता व रोहमन यांच्यामध्ये सगळं काही ठिक आहे.
रोहमनने इंस्टा स्टोरीमध्ये एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रोहमनच्या हातात एक पुस्तक आहे. या पुस्तकावर लिहिलंय की, मेरे दिल को आपके साथ घर मिल गया है. या व्हिडिओत सुश्मिता सेन आपल्या दोन्ही मुलींसोबत दिसते आहे. या व्हिडिओत सुश्मिताचा चेहरा दिसत नाही मात्र तिच्या दोन्ही मुलींचा चेहरा दिसतो आहे.
रोहमनने यापूर्वी इंस्टावर काही पोस्ट शेअर केले होते. ज्यामुळे ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा मिळाला होता. रोहमनने लिहिले की, तर तुला वाटतं की तू हे नाते टिकवण्यासाठी खूप काही करत आहे आणि तुझा पार्टनर काहीच करत नाही. ठीक आहे. तुला हे समजण्याची गरज आहे की तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी जे करता तो तुमचा निर्णय आहे. आपल्या पार्टनरकडून आपण जसे करू तसंच तेही करतील अशी अपेक्षा करू नका. त्यांच्यासाठी त्या गोष्टी करा ज्या तुम्हाला करायच्या आहेत. जे तुम्ही त्यांच्यासाठी करत आहात, त्यांनीदेखील तुमच्यासाठी केलं पाहिजे, म्हणून गोष्टी करू नका.
रोहमनने लिहिले की, तुम्ही एकटे असताना बोर होता का? ठीक आहे. तर तुम्ही कोणाकडून अपेक्षा कशी ठेवू शकता की समोरची व्यक्तीला तुमच्यात रस आहे. जिथे तुम्ही स्वतःला एण्टरटेन करू शकत नाही. दररोज फोन, टीव्ही व पुस्तक आणि इतर गोष्टींसोबत १५ ते २० मिनिटं स्वतःसोबत व्यतित करा. स्वतःचा आवाज ऐका, स्वतःशी बोला. यामुळे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.
नुकताच रोहमन सुश्मिताचा भावाच्या लग्नातही पहायला मिळाला होता.