Join us
Daily Top 2Weekly Top 5

तैमूरकडून रोहित शेट्टीला करून घ्यायचे होते 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 18:15 IST

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा नुकताच 'सिम्बा' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून या सिनेमाने १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे.

ठळक मुद्देरोहित शेट्टीने तैमूरकडे व्यक्त केली इच्छातैमूरने सिम्बाचे करावे प्रमोशन - रोहित शेट्टी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचा नुकताच 'सिम्बा' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून या सिनेमाने १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. रणवीर सिंग व सारा अली खान या नव्या जोडीला प्रेक्षकांची खूप चांगली दाद मिळते आहे. रणवीर, सारा व रोहित शेट्टीने 'सिम्बा'चे खूप प्रमोशन देखील केले.

'सिम्बा'च्या प्रमोशनदरम्यान रोहित शेट्टीने सांगितले की, तैमूरने सिम्बाचे प्रमोशन का केले पाहिजे?  रोहित शेट्टीने 'इंडियाज् गॉट टॅलेंट'च्या मंचावर चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तैमूरने देखील सिनेमाचा प्रचार करण्याची मागणी केली. रोहित म्हणाला की, माझी इच्छा आहे की तैमूरने आपली बहिण सारा अली खानच्या चित्रपटाचे प्रमोशन केले पाहिजे. खरेतर या कार्यक्रमाच्या सेटवर साराचा एक फोटो दाखवण्यात आला ज्यात ती तैमूरला राखी बांधताना दिसत होती. त्यावेळी करण जोहरने तैमूरच्या लोकप्रियतेबद्दल सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी रोहित शेट्टी म्हणाला की, मी साराला सांगतो की तिने तिचा भाऊ तैमूरला एक दिवस सिम्बाचे टीशर्ट घालावे. ज्यामुळे चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल.तैमूर फक्त दोन वर्षाचा असून त्याची सोशल मीडियावर लोकप्रियता जास्त आहे. त्याच्या चाहत्या वर्गामध्ये कित्येक प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रेटींचा देखील समावेश आहे. एका मुलाखतीत रणवीर सिंगने तैमूरच्या वडिलांची भूमिका निभावण्याची इच्छा व्यक्त केली होती. इतकेच नाही तर याहूच्या टॉप सर्च सेलिब्रेटीच्या यादीत तैमूरने १० वे स्थान पटकावले होते. तसेच तैमूरचा बाहुला देखील बाजारात उपलब्ध आहे. 

टॅग्स :सिम्बातैमुररोहित शेट्टीसारा अली खानरणवीर सिंग