काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीनेफराह खानसोबत एक फोटो शेअर करत, एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. मी लवकरच फराहसोबत एक चित्रपट घेऊन येतोय, असे त्याने म्हटले होते. अर्थात हा नवा चित्रपट कोणता, हे गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय. होय, अमिताभ बच्चन- हेमा मालिनी स्टारर एका सुपरडुपर हिट चित्रपटाचा रिमेक घेऊन रोहित शेट्टी व फराह खान प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. हा चित्रपट कुठला तर ‘सत्ते पे सत्ता’. अमिताभ व हेमा यांचा ‘सत्ते पे सत्ता’ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर ही बातमी वाचून तुमची उत्सुकता शिगेला पोहोचली असणार, हे नक्की.
रोहित शेट्टीच्या अंदाजात पाहायला मिळणार अमिताभ- हेमाच्या या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 16:34 IST
काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने फराह खानसोबत एक फोटो शेअर करत, एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. मी लवकरच फराहसोबत एक चित्रपट घेऊन येतोय, असे त्याने म्हटले होते. अर्थात हा नवा चित्रपट कोणता, हे गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय.
रोहित शेट्टीच्या अंदाजात पाहायला मिळणार अमिताभ- हेमाच्या या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक!
ठळक मुद्देतूर्तास रोहित शेट्टी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.