Join us

 रोहित शेट्टीने सुरु केली ‘सिंघम’ सीरिजची तयारी! देणार धम्माल सरप्राईज!! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 14:32 IST

सिंघम,  सिंघम रिटर्न , सिम्बा आणि सूर्यवंशी या ‘कॉप ड्रामा’ नंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी चाहत्यांसाठी एक खास सरप्राईज घेऊन येतोय.

ठळक मुद्दे सध्या रोहित शेट्टी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे.

सिंघम,  सिंघम रिटर्न , सिम्बा आणि सूर्यवंशी या ‘कॉप ड्रामा’ नंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी चाहत्यांसाठी एक खास सरप्राईज घेऊन येतोय.  सिंघम, सिंघम रिटर्न, सिम्बा या चित्रपटांत रोहितने पोलिस अधिका-यांची कथा दाखवली. रोहितचा आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’ हाही एका पोलिस अधिका-यांचीच कथा आहे. रोहितच्या या ‘कॉप ड्रामा’चे खास चाहते आहेत. म्हणूनच या सर्व चित्रपटांनी बॉक्सआॅफिसवर बक्कळ कमाई केली. ‘सूर्यवंशी’ नंतर रोहित आणखी असाच ‘कॉप ड्रामा’ घेऊन येतोय. पण यात एक सरप्राईज असणार आहे. होय, रोहितच्या या चित्रपटात कुण्या पोलिस अधिका-याची कथा नसेल तर एका महिला पोलिस अधिका-याची स्टोरी असेल. म्हणजेच, रोहित एका ‘लेडी सिंघम’ची स्टोरी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येईल. आहे ना सरप्राईज.

अलीकडे एका इव्हेंटमध्ये खुद्द रोहितने याची माहिती दिली. ‘सिंघम’सीरिजमध्ये एका महिला पोलिस अधिका-याची कथा मी पडद्यावर आणू इच्छितो. सध्या  या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे. माझ्या मते, हा चित्रपट येण्यासाठी आणखी एक ते दोन वर्षांचा कालावधी लागेल, असे रोहित म्हणाला.  प्रेक्षकांचे मनोरंजन हाच माझा अजेंडा आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन माझ्यासाठी हा एक ध्यास आहे आणि व्यवसायही. कर्तव्य म्हणून मी माझ्या या व्यवसायाकडे बघतो आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करतो. चित्रपट बनवणे हे कुण्या एकाचे काम नसते. त्यामागे अख्ख्या टीमचे कष्ट असतात. तुमच्याकडे एक चांगली टीम असेल तर चांगले काम होणार आणि यातून स्टारडम निर्माण होणार, असेही रोहित म्हणाला.

  एकंदर काय तर रोहितने ‘लेडी सिंघम’वर काम सुरु केलेय आणि त्याचा हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असणार आहे. सध्या रोहित शेट्टी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित पहिल्यांदा अक्षयसोबत काम करतोय. 

टॅग्स :रोहित शेट्टी