Join us

‘रॉकी हँण्डसम’ ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 22:33 IST

जॉन अब्राहम सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘रॉकी हॅण्डसम’ मुळे चर्चेत आहे. 

जॉन अब्राहम सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘रॉकी हॅण्डसम’ मुळे चर्चेत आहे. ‘दृश्यम’,‘फोर्स’ आणि मराठी चित्रपट ‘लय भारी’ नंतर निशिकांत कामत आता ‘रॉकी हॅण्डसम’ घेऊन परततोय. यात जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहे.श्रुती हसन मुख्य भूमिकेत असून दिव्या चालवाड ही बालकलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. जॉनच्या भूमिकेत आपलं म्हणणारं असं कोणीही नसतं. तेवढ्यात ‘नाओमी’ नावाची एक मुलगी किडनॅप होते. आणि तो अचानकपणे तिच्यासाठी कोणतीही रिस्क घ्यायला तयार होतो. त्याने चित्रपटासाठी ऐकाडो, हपकिडो आणि क्रवमागा हे मार्शल आर्ट्समधील फॉर्मस शिकले आहेत. शूटिंग हैदराबाद, गोवा आणि मुंबई येथे करण्यात आली आहे.