आज ७१ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा थाटामाटात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार ज्यांना जाहीर झाले त्यांना गौरवण्यात आलं. यावेळी भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित होतो. याच पुरस्कार सोहळ्यात करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यानिमित्त सिनेमाचे निर्माते अपूर्व मेहता यांनी हा पुरस्कार स्वीकारला.अपूर्व मेहता यांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान
७१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मनोरंजक फिल्म (बेस्ट पॉप्युलर फिल्म प्रोवायडिंग होलसम एंटरटेनमेंट) या कॅटेगरीत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानिमित्त निर्माते अपूर्व मेहता यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. या सिनेमाचा दिग्दर्शक करण जोहर सुद्धा या खास क्षणी उपस्थित होता. अपूर्व मेहता यांनी सन्मान स्वीकारल्यावर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.