२०१० मध्ये आलेल्या ‘एंथिरान’ या सिनेमाचा हा सीक्वल असून, ‘२.०’ मध्ये रजनीकांत एका वैज्ञानिकाच्या आणि रोबोटच्या दुहेरी भूमिकेत बघावयास मिळणार आहे. रजनीकांत व्यतिरिक्त अक्षयकुमारही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, तो यात खलनायक साकारत आहे. त्याचबरोबर एमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसेन यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा यावर्षी दिवाळीत रिलिज होणार असून, हिंदीबरोबरच तामिळ आणि तेलगूमध्येही एकाच वेळी पडद्यावर झळकणार आहे. न्यूज एजंसी आयएएनएसच्या माहितीनुसार या सिनेमाचे बजेट ४५० कोटी रुपये आहे. लायका प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत बनविण्यात येत असलेल्या या सिनेमात जबरदस्त अॅक्शन बघावयास मिळणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वीएफएक्सचा वापर करण्यात आला असून, त्यासाठी साधारणत: सात महिन्यांचा कालावधी लागला होता. ज्या गाण्याची शूटिंग शिल्लक असल्याचे शंकर यांनी सांगितले ते गाणे रजनीकांत आणि एमी जॅक्सन यांच्यावर शूट करण्यात येणार आहे.}}}} ">With my team after finishing a major scene of #2.0 . One song and some patch works are only the balance pic.twitter.com/SG6o1nLUW4— Shankar Shanmugham (@shankarshanmugh) March 9, 2017
पुन्हा बघायला मिळेल ‘रोबोट’चा थरार; ‘2.0’ची शूटिंग पूर्ण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 14:14 IST
सुपरस्टार रजनीकांत याची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ‘२.०’ या सिनेमाची शूटिंग जवळपास पूर्ण झाली असून, प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘रोबोट’चा ...
पुन्हा बघायला मिळेल ‘रोबोट’चा थरार; ‘2.0’ची शूटिंग पूर्ण!
सुपरस्टार रजनीकांत याची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ‘२.०’ या सिनेमाची शूटिंग जवळपास पूर्ण झाली असून, प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘रोबोट’चा थरार अनुभवयास मिळणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शक शंकर यांनी नुकतेच ट्विटरवर याबाबतची माहिती दिली असून, टीमचा एक फोटोही त्यांनी यावेळी शेअर केला आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटले की, नुकतेच या सिनेमाच्या एका महत्त्वपूर्ण भागाची शूटिंग पूर्ण करण्यात आली असून, केवळ एक गाणे आणि काही दृश्य शूट करणे बाकी आहे. रजनीकांत यांनी ‘रोबोट’ या सिनेमात वैज्ञानिक आणि रोबोटची भूमिका साकारून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. या सिनेमातील स्टंट बघण्यासारखे होते. शिवाय तंत्रज्ञानाच्याही जबरदस्त वापर यात केल्याचे बघावयास मिळाले. आता ‘२.०’मध्येही अशाच प्रकारचे काहीसे स्टंट आणि तंत्रज्ञान बघावयास मिळण्याची शक्यता आहे. आता प्रेक्षकांना या सिनेमाशी संबंधित आगामी काळात येणाºया अपडेट््सची प्रतीक्षा आहे. दरम्यान, अक्षय या सिनेमा व्यतिरिक्त ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ आणि ‘पॅडमॅन’ या सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.