सलमान खान हा त्याच्या मजेशीर स्वभावामुळे ओळखला जातो. सलमान सध्या सिनेमांच्या शूटिंगसोबत अनेक जाहीर इव्हेंटमध्ये हजेरी लावताना दिसतो. सलमानचं फॅन फॉलोईंग इतकं आहे की त्याला विविध ठिकाणांहून आमंत्रण येत असतात. अशातच नुकतंच सलमान ISPL इव्हेंटमध्ये गेला होता. त्यावेळी तिथे असलेल्या एका रोबोटजवळ सलमान उभा राहिला. सलमानने रोबोटशी हात मिळवायचा प्रयत्न केला. परंतु रोबोटने मात्र हात मिळवला नाही. पुढे काय घडलं?सलमानसोबत रोबोटने हात मिळवला नाही, पुढे...ISPL लीगच्या कार्यक्रमात सलमान उपस्थित होतो. सलमानची टीमसुद्धा ISPL मध्ये सहभागी आहे. अशातच तिथल्या कार्यक्रमात सलमान अधिकाऱ्यांशी हस्तांदोलन करत होता. सर्वांना भेटत असताना सलमान अचानक एका रोबोटसमोर उभा राहिला. सलमानने रोबोटशी हात मिळवायचा प्रयत्न केला. परंतु रोबोटने मात्र हात मिळवला नाही. ''नाराज दिसतोय वाटतं...''; अशी सलमानने मजेशीर टिप्पणी केली. परंतु यामुळे रोबोटला सांभाळणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता.
Web Summary : At an ISPL event, a robot initially refused to shake hands with Salman Khan, leading to a funny moment. Salman quipped about the robot being upset. Later, the robot extended its hand, and Salman reciprocated, bringing smiles to everyone.
Web Summary : एक ISPL कार्यक्रम में, एक रोबोट ने शुरू में सलमान खान से हाथ मिलाने से इनकार कर दिया, जिससे एक मजेदार पल बन गया। सलमान ने रोबोट के नाराज होने पर चुटकी ली। बाद में, रोबोट ने अपना हाथ बढ़ाया, और सलमान ने जवाब दिया, जिससे सभी के चेहरे पर मुस्कान आ गई।