Join us

अक्षयचा ‘रोबोट २’ फर्स्ट लुक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 13:01 IST

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा दिग्दर्शक शंकर यांच्या ‘रोबोट २’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हाच चित्रपट तमीळ भाषेत ...

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा दिग्दर्शक शंकर यांच्या ‘रोबोट २’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हाच चित्रपट तमीळ भाषेत ‘एंथीरन २’ नावानी रिलीज होणार आहे. रजनीकांत चित्रपटात अ‍ॅमी जॅकसनसोबत दिसणार आहे. ‘एन्थीरन २’ हा चित्रपट भारतातील सर्वांत महागडा चित्रपट असणार आहे.चित्रपटाच्या टीमने सांगितले की, अक्षय कुमारच्या जागेवर आमीर खानला खलनायकाच्या भूमिकेसाठी घेण्यात येणार होते अशी चर्चा प्रथम सुरू होती. ‘टर्मिनेटर स्टार’ अर्नाेल्ड याला व्हिलेन म्हणून घ्यायचे याविषयीही चर्चा सुरू होती. अक्षय कु मार चैन्नईत चित्रपटाच्या टीमने आयोजित केलेल्या पुजेसाठी आला होता.शंकर आणि संपूर्ण टीम यांना तो भेटला. तसेच रजनीकांतसोबतची त्याची पहिली मिटिंग विषयी तो खुप उत्सुक होता.