Join us

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती भावुक; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 16:47 IST

Sidharth Shukla : सिद्धार्थने वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्यामुळे चाहत्यांवर आणि संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देरिया चक्रवर्तीने सिद्धार्थला वाहिली श्रद्धांजली

'बिग बॉस १४'चा विजेता आणि प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सिद्धार्थने वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्यामुळे चाहत्यांवर आणि संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. यामध्येच अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिनेदेखील सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली असून सोशल मीडियावर आता तिची चर्चा रंगू लागली आहे.

रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सिद्धार्थचा एक ब्लॅक एण्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने  'Rest In Peace' अशी कॅप्शन दिली आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. रियाप्रमाणेच अभिनेता आसिम रियाज, अर्शी खान, राखी सावंत, राहुल महाजन या कालाकारांनीही सिद्धार्थचा फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, सिद्धार्थने झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली होती. मात्र, ही औषधे घेतल्यानंतर त्याला परत जाग आलीच नाही. त्यामुळे तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, रुग्णालयात गेल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असं रुग्णालयाने स्पष्ट केलं.  

टॅग्स :सिद्धार्थ शुक्लारिया चक्रवर्ती