Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिया चक्रवर्तीने NCBच्या चौकशीत नाही घेतले कोणत्याच बॉलिवूड सेलिब्रेटीचे नाव, सतीश मानशिंदेंचा दावा

By तेजल गावडे | Updated: September 24, 2020 17:41 IST

रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांनी एनसीबीच्या चौकशीदरम्यान रियाने कोणत्याच बॉलिवूड सेलिब्रेटींचे नाव घेतले नसल्याचे सांगितले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर असे बोलले जात आहे की रियाने चौकशीदरम्यान एनसीबीला बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रेटींची नावे सांगितली आहेत. जे ड्रग्स घेतात. नुकतेच ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरोच्या चौकशीत बॉलिवूडच्या कित्येक अभिनेत्रींचे नाव समोर आले आहे. सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पादुकोण आणि रकुल प्रीत सिंगला समन्स बजावला आहे.

एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, यादरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांनी दावा केला आहे की ड्रग प्रकरणात रियाने कुणाचेच नाव घेतले नव्हते. एनसीबीचे सर्व दावे खोटे ठरले आहेत. रियाने चौकशीत कुणाचेच नाव घेतले नाही. जर एनसीबी किंवा कुणी दुसरे तिचे स्टेटमेंट लीक करत असेल तर ते पूर्ण चुकीचे आहे. रिया चक्रवर्तीने कुणाचे नाव घेतलेले नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सतीश मानशिंदे पुढे म्हणाले की, जया साहाचे सुशांत व रियासोबतचे चॅट होते ते केवळ सीबीडी ऑईल प्रिस्क्राइब करणे किंवा पाठवायचे होते जे गांज्याच्या पानांचा अर्क आहे. ते कोणते ड्रग्स नाही. तुम्ही सीबीडी बॉटल पाहू शकता ज्यात ड्रग्स संबंधीत कोणतीच गोष्ट नाही.

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

ड्रग्स प्रकरणात दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानसोबत कित्येक अभिनेत्रींना एनसीबीच्या समोर चौकशीसाठी यावे लागणार आहे. 

जया सहा आणि अनुजकच्या चौकशीतून दीपिकाचे नाव समोर जया सहा व ड्रग तस्कर अनुजकडील चौकशीतून प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोनचे नाव पुढे आले. त्याचबरोबर तिच्याकडे मॅनेजर म्हणून काम केलेल्या करिश्मा प्रकाश हिच्याशी तिचा ड्रग चॅट एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाला आहे. 28 ऑक्टोबर 2017 मध्ये एका पार्टीमध्ये तिने 'माल'ची विचारणा केली आणि तिला गांजाची पूर्तता केली जाईल, सांगण्यात आले आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांकडून विचारणा केली जाणार आहे.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतदीपिका पादुकोणसारा अली खानरकुल प्रीत सिंग