Join us

रिया चक्रवर्तीच्या ब्रा-लेस फोटोमुळे खळबळ; सोशल मीडियावर झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 14:26 IST

झटपट प्रसिद्धी मिळवायची असेल तर काही तरी हटके कारनामा करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे जणूकाही तंत्रच सेलिब्रेटींना सापडले ...

झटपट प्रसिद्धी मिळवायची असेल तर काही तरी हटके कारनामा करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे जणूकाही तंत्रच सेलिब्रेटींना सापडले आहे. त्यामुळे दररोज किमान एक तरी सेलिब्रेटी जी तिच्या मादक फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून देत असते. आता या सेलिब्रेटींमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचेही नाव जोडले गेले आहे. रियाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ब्रा-लेस फोटो शेअर करून एकच खळबळ उडवून दिली आहे. ‘मेरे डॅड की मारुती’ या सिनेमातून करिअरला सुरुवात करणाºया रिया चक्रवर्तीकडे फारशा सिनेमांच्या आॅफर्स नाहीत. मात्र अशातही सध्या ती चर्चेतला चेहरा बनली आहे. काही दिवसांपूर्वी तिने पोस्ट केलेला एक फोटो सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे. फोटोमध्ये रिया विना ब्रा अन् टॉपची दिसत आहे. तिने फक्त एक डेनिमची डंगरी परिधान केलेली आहे. यामध्ये तिचा लूक जबररदस्त हॉट दिसत असल्याने तिच्या फॅन्सकडून हा फोटो वाºयासारखा व्हायरल केला जात आहे. अभिनेत्रीबरोबर व्हिडीओ जॉकी म्हणून काम करणाºया रियाचा हा हॉट अंदाज सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोमध्ये रिया तिच्या फिगरप्रती किती सजग आणि जागरूक आहे, हे स्पष्ट होत आहे. वास्तविक रियाने यापूर्वीदेखील तिचे काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत. परंतु ब्रा-लेस फोटोमधील तिचा अंदाज बघण्यासारखा आहे. सध्या रिया तिच्या आगामी ‘हाफ गर्लफ्रेंड’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर लीड रोलमध्ये आहे. हा सिनेमा १९ मे रोजी रिलीज होणार आहे.