Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिया चक्रवती दिसणार 'या' अभिनेत्यासोबत रोमान्स करताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 16:31 IST

सूरज पंचोली मुराद खेतानी याच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. यात त्याच्या अपोझिट रिया चक्रवती दिसणार आहे. रिया आधी 'बँकचोर'मध्ये दिसली होती. अजून रियाचे नाव फायनल झालेले नाही.

ठळक मुद्देसूरज पंचोलीच्या अपोझिट रिया चक्रवती दिसणार आहे

सूरज पंचोली मुराद खेतानी याच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. यात त्याच्या अपोझिट रिया चक्रवती दिसणार आहे. रिया आधी 'बँकचोर'मध्ये दिसली होती. अजून रियाचे नाव फायनल झालेले नाही. सिनेमाची कथा काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत फिरणारी आहे.  सूरज यासाठी ट्रेनिंगसुद्धा घेतोय त्याने नवा हेअर कटदेखील केला आहे. सिनेमाची शूटिंग ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत काश्मिरमध्ये सुरु होईल.      

यासिनेमाशिवाय रिया मुकेश भट्टच्या 'जलेबी'मध्ये दिसणार आहे. ज्यात एक नवा चेहरा दिसणार आहे. पुष्पदीत भारव्दाज याचे दिग्दर्शन करणार आहे. यात सिनेमातून टीव्ही दिगांगना सूर्यवंशी मोठ्य पडद्यावर पदार्पण करतेय. दिगांगना ने 'वीरा' मालिके नंतर  2015 में बिग बॉस शोमध्ये भाग घेतला होता.वयाच्या 7 व्या वर्षापासून दिगांगना काम करत आहे. दिगांगना एक नाही दोन नाही तर चक्क तीन सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या आहेत.त्यामुळे ती खूप खुश आहे.सलमान खानच्या रूपात चांगला मेंटॉर मिळाला असल्याचेही ती सांगते. 

रियाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली होती. एमटिव्ही रिअॅलिटी शोमध्ये ती दिसली होती. यानंतर तिने एमटिव्हीवरील अनेक शोचे सूत्रसंचालन केले होते. 2012 मध्ये आलेल्या तेलुगु सिनेमा तुनेगा-तुनेगामधून तिने पदार्पण केले. या सिनेमात तिने निधी नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती.  

सूरजच्या प्रोफेशनल लाईफ बाबत बोलायचे झाले तर सूरज या अगोदर २०१५ मध्ये आलेल्या आथिया शेट्टीबरोबर ‘हीरो’ या सिनेमात झळकला होता. मात्र अजूनही तो दमदार भूमिकेच्या शोधात असल्याचेच वेळोवेळी दिसून आले आहे. 

टॅग्स :सुरज पांचोली