किंगखान शाहरुख खानची जादू ओसरू लागलीय. केवळ शाहरुख खानच नाही तर सलमान खान ते आमिर खान सर्वांचेच चित्रपट गतवर्षी बॉक्सआॅफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत. शाहरुखचा गतवर्षी रिलीज झालेला ‘झिरो’ दणकून आपटला. या चित्रपटानंतर शाहरुखकडे एकही चित्रपट नसल्याचे म्हटले जातेय. अलीकडे शाहरुखने राकेश शर्माचे बायोपिक करण्यास नकार दिला. यानंतर शाहरुखचा ‘डॉन 3’ हा आगामी चित्रपटही थंडबस्त्यात गेल्याची बातमी आली. ‘डॉन 3’चा निर्माता फरहान सध्या त्याच्या अॅक्टिंगवर लक्ष केंद्रीत करू इच्छितो आणि त्यामुळेचं ‘डॉन 3’ थंडबस्त्यात गेल्याची चर्चा वा-यासारखी पसरली. पण आता ‘डॉन 3’चे को-प्रोड्यूसर रितेश सिधवानी यांनी या चित्रपटाबद्दल नवा खुलासा केला आहे.
शाहरुख खानच्या ‘डॉन 3’बद्दल निर्मात्यांचा मोठा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 11:49 IST
अलीकडे शाहरुखने राकेश शर्माचे बायोपिक करण्यास नकार दिला. यानंतर शाहरुखचा ‘डॉन 3’ हा आगामी चित्रपटही थंडबस्त्यात गेल्याची बातमी आली. पण आता ‘डॉन 3’चे को-प्रोड्यूसर रितेश सिधवानी यांनी या चित्रपटाबद्दल नवा खुलासा केला आहे.
शाहरुख खानच्या ‘डॉन 3’बद्दल निर्मात्यांचा मोठा खुलासा!
ठळक मुद्दे‘डॉन ’ फ्रेन्चाईजीचा तिसरा चित्रपट पाहण्यास प्रत्येक जण उत्सूक आहे आणि आम्ही चाहत्यांना निराश करू इच्छित नाही,’ असे रितेश यांनी सांगितले.