Join us
Daily Top 2Weekly Top 5

​रितेशने आणले गणेशभक्तांसाठी खास गाणे !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 12:13 IST

सर्वत्र गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून खास गणेशभक्तांसाठी रितेश देशमुखने ‘थॅँक गॉड बाप्पा’ हे गाणे आणले आहे.

सर्वत्र गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून खास गणेशभक्तांसाठी रितेश देशमुखने ‘थॅँक गॉड बाप्पा’ हे गाणे आणले आहे. विशेष म्हणजे या गाण्याला रितेशने स्वत:चा आवाज दिला आहे.थँक गॉड बाप्पा गाण्यात रितेशचा एक अनोखा अंदाज पाहायला मिळतो. गणपतीचे विविध रंग या गाण्यात दाखवण्यात आले आहेत. बाप्पा हा आपल्यासारखा नसतो, असंही गाण्यातून दाखवण्यात आलं आहे. बॉलिवूूडमधून या गाण्याचं जोरदार कौतुक केलं आहे. शिवाय हे गाणं हिंदीतही करण्यात यावं अशी मागणी केली जात आहे.