Join us

लातूरमध्ये देशमुखांचे दिवाळी सेलिब्रेशन! रितेश-जेनेलियाच्या मुलांनी लावली दिव्यांची आरास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 18:46 IST

जिनिलीया आणि रितेश देशमुख यांच्या लातूरमधील घरीही दिवाळीचा उत्साह दिसून आला.

सध्या सगळीकडे दिवाळीची धूमधाम बघायला मिळत आहे. सामान्य माणसांपासून कलाकारापर्यंत प्रत्येकजण मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी करत आहे. जिनिलीया आणि रितेश देशमुख यांच्या लातूरमधील घरीही दिवाळीचा उत्साह दिसून आला. जिनिलीयाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये देशमुखांच्या घरच्या दिवाळीची झलक पाहायला मिळत आहे. 

जिनिलीयाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रियान आणि राहील दिव्यांची आरास लावताना दिसून येत आहेत.  अभिनेत्रीने या व्हिडीओला ‘वेड’ चित्रपटातील “सुख कळले…” हे गाणं लावलं आहे.  तर याआधी जिनिलीयाने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात जिनिलीया रियान आणि राहीलला उटणं लावून अभ्यंगस्नान घालत असल्याचं पाहायला मिळालं.  नेटकऱ्यांनी जिनिलीयाच्या या व्हिडीओंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

जिनिलीया आणि रितेश देशमुख यांची जोडी मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांनीही जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. मराठी परंपरा, संस्कृती व सण साजरी करतात. दिवाळीनिमित्त सगळेच सेलिब्रिटी आप-आपल्या परीने सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत आहेत. त्यांचे चाहतेही त्यांचं भरभरुन कौतुक करत दाद देत आहेत.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजादिवाळी 2023