Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेनेलियावर नाही रितेश देशमुखचं प्रेम, खुद्द त्यानेच दिली कबूली, पहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 16:41 IST

रितेश व जेनिलिया यांच्या लग्नाला नुकतीच ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र आता रितेशने इंस्टाग्रामवर जेनेलियावर प्रेम नसल्याचे सांगितलं आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा या जोडीकडे पाहिलं जातं. 'तुझे मेरी कसम' या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. रितेश व जेनिलिया यांच्या लग्नाला नुकतीच ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र आता रितेशने इंस्टाग्रामवर जेनेलियावर प्रेम नसल्याचे सांगितलं आहे.

रितेशने इंस्टाग्रामवर मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रितेशसोबत जेनेलियादेखील आहे. यात जेनेलिया रितेशला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असे सांगते. त्यावर रितेश मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करतो असे सांगतो. रितेश असं बोलल्यावर जेनेलिया त्याला काय म्हणालास असे विचारते आणि रितेश म्हणतो की बेबी तुझ्या स्माईलवर माझं प्रेम आहे.  

रितेश व जेनेलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. जेनेलिया आणि रितेशच्या प्रेम प्रकरणाला तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच सुरुवात झाली. या चित्रपटाचे चित्रीकरण हैद्राबादमध्ये सुरू असल्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांनी एकमेकांसोबत खूप वेळ घालवला होता. चित्रीकरण संपल्यावर मुंबईत परतल्यावर ते दोघे एकमेकांना मिस करू लागले. एकमेकांना भेटण्याची ते संधीच शोधत असत. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे त्या दोघांना देखील कळले नव्हते.

जेनेलिया आणि रितेश यांचे अफेअर सुरू झाल्यानंतर त्यांना लगेचच लग्न करायचे होते. पण रितेशनचे वडील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा सुरुवातीला रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाला विरोध होता.

जेनेलिया ही ख्रिश्चन तर रितेश हा हिंदू असल्याने विलासरावांना हे लग्न मान्य नव्हते. पण काही काळांनी त्यांचा विरोध मावळला आणि रितेश आणि जेनेलिया यांचे लग्न धुमधडाक्यात झाले. त्या दोघांनी ख्रिश्चन आणि हिंदू दोन्ही पद्धतीने विवाह केला.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा