रितेशचे वडील विलासराव देशमुखांना पसंत नव्हती जेनेलिया; करावे लागले दोनदा लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 17:26 IST
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा बी-टाउनमधील सर्वांत क्युट जोड्यांपैकी एक आहे. दोघांची पहिली भेट हैदराबाद येथे ‘तुझे मेरी कसम’ ...
रितेशचे वडील विलासराव देशमुखांना पसंत नव्हती जेनेलिया; करावे लागले दोनदा लग्न!
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा बी-टाउनमधील सर्वांत क्युट जोड्यांपैकी एक आहे. दोघांची पहिली भेट हैदराबाद येथे ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या टेस्ट शूटदरम्यान झाली होती. चित्रपटात दोघे एकमेकांचे को-स्टार होते. जेनेलिया जेव्हा पहिल्यांदाच रितेशला विमानतळावर भेटली तेव्हा ती त्याला इग्नोर करीत होती. ती तिच्या आईसोबत आली होती. रितेशचे वडील विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यामुळे जेनेलियाला असे वाटत होते की, रितेशही कदाचित एखादा नेता होईल. मात्र जेव्हा ती रितेशला भेटली आणि तिच्या परिवाराप्रती रितेशचा मनात असलेला सन्मान तिने बघितला तेव्हा ती त्याला चांगलीच इम्प्रेस झाली. पुढे जेव्हा या दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली तेव्हा रितेशचे वडील दिवंगत विलासराव देशमुख यांना त्यांचे नाते पसंत नव्हते. मात्र जसजसा काळ गेला ता जेनेलियाने रितेशच्या परिवारातील लोकांची मने जिंकली. विलासरावांचा नकार तिने होकारात बदलला. परंतु तुम्हाला माहिती आहे काय की, रितेश आणि जेनेलियाने एकदा नव्हे तर दोनदा लग्न केले? नाही ना, चला आज आम्ही याचाही खुलासा करीत आहोत. होय, या दोघांनी एकदा नव्हे तर दोनदा लग्न केले. वास्तविक ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटादरम्यानच रितेश आणि जेनेलिया एकमेकांच्या प्रेमात पडले. शूटिंगनंतर रितेशने जेनेलियाला कित्येक दिवस मिस केले. पुढे दोघांचे फोनवर बोलणे सुरू झाले. शिवाय दोघेही रात्री उशिरापर्यंत को-कॉफी हाउसमध्ये भेटू लागले. खरं तर कॉफी शॉपमध्ये भेटण्यासाठीदेखील दोघांना चांगलेच कष्ट घ्यावे लागले. रितेश आणि जेनेलियाने एका मुलाखतीत म्हटले होते की, जेव्हा आम्हाला एकमेकांना भेटायचे असे, तेव्हा आम्ही मिटिंगमध्ये जात असल्याचे कारण देऊन कॉफी शॉपमध्ये भेटत होतो. पुढे हळूहळू दोघांची मैत्री प्रेमात बदलली. दोघे जवळपास दहा वर्षे एकमेकांना डेट करीत होते. मात्र ही बाब अजूनही कोणाला माहिती नाही की, अखेर कोणी कोणाला प्रपोज केले? पुढे ३ फेब्रुवारी २०१२ रोजी दोघे विवाहबंधनात अडकले. मात्र त्यांना दोनदा लग्न करावे लागले. कारण जेनेलिया ख्रिश्चयन परिवारातून होती. त्यामुळे अगोदर या दोघांनी चर्चमध्ये लग्न उरकले. त्यानंतर महाराष्ट्रीयन परंपरेनुसार रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाचा बार उडवून देण्यात आला. रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाले आहेत. या पाच वर्षांत त्यांच्या जीवनात दोन चिमुकल्या पाहुण्यांचीही एंट्री झाली आहे. दोघेही त्यांच्या परिवारात आनंदी आहेत. रितेश अजूनही इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिव्ह आहे. मात्र जेनेलियाने इंडस्ट्रीमधून लांब राहत संसारात लक्ष केंद्रित केले आहे.