२००६ मध्ये आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकाने आणि निखळ विनोदाने प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा 'मालामाल वीकली' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास २० वर्षांनंतर या सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलची (Malamaal Weekly 2) अधिकृत तयारी सुरू झाली असून, यामध्ये बॉलिवूडचे दिग्गज विनोदी कलाकार एकत्र दिसणार आहेत.
जुनी जोडी, नवा धमाका
दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपटांपैकी एक मानला जातो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीक्वलमध्ये जुन्या चित्रपटातील मुख्य त्रिकूट म्हणजेच परेश रावल (लिला राम), रितेश देशमुख (कन्हैया) आणि राजपाल यादव (बाजी) पुन्हा एकदा पडद्यावर धुमाकूळ घालताना दिसतील. या तिघांच्या जबरदस्त कॉमिक टाइमिंगमुळे प्रेक्षकांमध्ये आतापासूनच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
पहिल्या भागात एका लॉटरीच्या तिकीटावरून उडालेला गोंधळ आणि त्यातून निर्माण झालेली विनोदी परिस्थिती प्रेक्षकांनी अनुभवली होती. दुसऱ्या भागातही दिग्दर्शक अशीच काहीशी रंजक आणि मजेशीर कथा घेऊन येत आहेत. 'मालामाल वीकली २' ची स्क्रिप्ट सध्या अंतिम टप्प्यात असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियावर या चित्रपटाच्या सीक्वलची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. "खऱ्या विनोदाची मेजवानी पुन्हा मिळणार," अशी प्रतिक्रिया चाहते व्यक्त करत आहेत. लिला राम आणि बाजी यांची जुगलबंदी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
Web Summary : The much-loved comedy 'Malamaal Weekly' is getting a sequel after 20 years! The original trio—Paresh Rawal, Ritesh Deshmukh, and Rajpal Yadav—are set to return with a new, hilarious storyline. Scripting is in final stages; filming to begin soon.
Web Summary : 'मालामाल वीकली' का सीक्वल 20 साल बाद आ रहा है! परेश रावल, रितेश देशमुख और राजपाल यादव की तिकड़ी नई कहानी के साथ वापसी करेगी। स्क्रिप्ट अंतिम चरण में है, जल्द ही शूटिंग शुरू होगी।