Join us

रितेश देशमुखने जेनेलियाला म्हटले, ‘बिन तुम्हारे मैं बिखर जाता’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 21:20 IST

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दाम्पत्यांपैकी एक रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा हे दाम्पत्य आहे. त्यांच्यातील ट्यूनिंग बघण्यासारखी आहे. लग्नानंतर जेनेलियाने अभिनयापासून ...

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दाम्पत्यांपैकी एक रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा हे दाम्पत्य आहे. त्यांच्यातील ट्यूनिंग बघण्यासारखी आहे. लग्नानंतर जेनेलियाने अभिनयापासून अंतर निर्माण केले असून, ती आता संसारात लक्ष देत आहे. तर रितेश त्याच्या करिअरवर फोकस करून आहे. जेव्हा-जेव्हा या दाम्पत्याला त्यांच्यातील प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते, तेव्हा-तेव्हा हे दोघेही मुक्त कंठाने त्यांच्यातील प्रेमभाव व्यक्त करतात. आता हेच बघा ना जेनेलियाने नुकताच तिचा ३०वा वाढदिवस साजरा केला. पत्नी जेनेलियाचा वाढदिवस खास करण्यासाठी रितेशनेदेखील नेहमीच्या अंदाजात तिला शुभेच्छा दिल्या. त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर करताना लिहिले की, ‘हॅप्पी बर्थ डे बायको... तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, तू माझ्या पाठीशी आहेस... शिवाय तू एक कणखर आणि धाडसी आई आहेस... बिन तुम्हारे मैं बिखर जाता’ रितेश या ओळीतून जेनेलियावरील त्याचे असलेले प्रेम दाखवून देतो. रितेशच्या या ट्विटला पत्नी जेनेलियानेही उत्तर दिले. तिने लिहिले की, ‘आय लव्ह यू रितेश... मी आहे... कारण तू माझ्या जवळ आहेस... तू माझी ताकद आहेस... तू माझे प्रेम अन् आयुष्य आहेस’ जेनेलियाच्या या ओळी दोघांमधील केमिस्ट्री दर्शविणाºया असून, एकमेकांवर त्यांचे असलेले प्रचंड प्रेम दाखवून देतात. दरम्यान, जेनेलिया गेल्या काही काळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. खरं तर लग्नानंतरच तिने चित्रपटांमधून ब्रेक घेतला. तर रितेश त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये सध्या व्यस्त आहे. हिंदीबरोबरच तो मराठी प्रोजेक्टवरही काम करीत आहे. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. खरं तर रितेशचा पत्नीला शुभेच्छा देण्याचा हाच अंदाज आहे. कारण वाढदिवशीदेखील त्याने काहीशा याच अंदाजात पत्नी जेनेलियाला शुभेच्छा दिल्या होत्या.