Join us

लीक झाला ऋषी कपूर यांच्या अखेरच्या क्षणांचा व्हिडिओ, हॉस्पिटलला पाठवली लीगल नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 09:48 IST

ऋषी कपूर यांच्या जीवनातील अखेरच्या क्षणांचा व्हिडिओ आता वादाच्या भोवऱ्यात आला आहे.  

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या अखेरच्या क्षणांचा व्हिडिओ लीक झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. याच व्हायरल व्हिडिओवर नाराजी व्यक्त करत   'द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज' (FEICE) कडून सर एच.एन . रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.FWICE कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पत्रामध्ये व्हिडिओसंबंधीचे काही मुद्दे मांडण्यात आले आहेत. ज्यामध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला हा व्हिडिओ अतिदक्षता विभाग अर्थात आयसीयूमध्ये चित्रीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या व्हिडिओमध्ये ऋषी कपूर रुग्णांच्या बेडवर असून, त्यांना श्वासोच्छवास घेण्यास अडचण येत असल्याचेही पाहायला मिळत आहे.

या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, ३० एप्रिल या दिवशी व्हॉट्सऍपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणारा व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला. हा व्हिडिओ अतिदक्षता विभागात घेतला गेल्याचं कळलं. जिथे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना २९ एप्रिलला दाखल करण्यात आले होते.

३० एप्रिलला सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी या ठिकाणीच अखेरचा श्वास घेतला. या व्हिडिओमध्ये कपूर यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. तसेच या व्हिडिओमध्ये ऋषी कपूर यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. त्यांची खालावलेली प्रकृतीही दिसत आहे. शिवाय एक परिचारिकाही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मुख्य म्हणजे हा व्हिडिओ कपूर यांच्या कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय घेतल्याचे इथे स्पष्ट होत आहे. '  याच काही कारणांसह ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

टॅग्स :ऋषी कपूर