लग्नानंतरही ऋषी कपूरचे जुही चावला आणि दिव्या भारतीशी होते अफेअर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 18:39 IST
लग्नानंतरही एखाद्या कलाकाराच्या दुसºया अभिनेत्रींशी अफेअर असल्याची चर्चा नेहमीच ऐकावयास मिळतात. अक्षयकुमार असो वा अजय देवगण या कलाकारांचे लग्नानंतरही ...
लग्नानंतरही ऋषी कपूरचे जुही चावला आणि दिव्या भारतीशी होते अफेअर!!
लग्नानंतरही एखाद्या कलाकाराच्या दुसºया अभिनेत्रींशी अफेअर असल्याची चर्चा नेहमीच ऐकावयास मिळतात. अक्षयकुमार असो वा अजय देवगण या कलाकारांचे लग्नानंतरही इतर अभिनेत्रींशी नाव जोडले गेले आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला अभिनेता ऋषी कपूर यांच्या अफेअरचे किस्से सांगणार आहोत. ऋषी कपूर यांना त्यांच्या काळात चॉकलेट हिरो म्हणून ओळखले जात होते. ऋषी कपूर आणि त्यांच्या पत्नी नितू कपूर यांच्यातील लव्हस्टोरी त्याकाळी चांगलीच गाजली होती. परंतु याहीपेक्षा ऋषी कपूरचे इतर अभिनेत्रींबरोबरच्या अफेअर्सच्या चर्चा अधिक रंगल्या. डिंपल कपाडिया, दिव्या भारती आणि जुही चावला आदी अभिनेत्रींसोबत त्यांचे नाव जोडले गेले. एका मुलाखतीदरम्यान नितू सिंग यांनीच ऋषीच्या या अफेअर्सचा खुलासा केला होता. त्यांनी म्हटले होते की, माझ्याशी लग्न झाल्यानंतरही ऋषीच्या अफेअर्सच्या चर्चा समोर येत होत्या. मात्र अशातही मी सर्व काही माहीत असतानाही माहीत नसल्यासारखी वागली. कारण मला माझे वैवाहिक जीवन संपवायचे नव्हते. नितू ऋषीच्या आयुष्यात येण्याअगोदर ऋषी यासमिन नावाच्या अभिनेत्रीवर प्रेम करीत होते. जवळपास पाच वर्षे दोघांचे अफेअर चालले. त्यानंतर ऋषी कपूरचे डिंपल कपाडियावर मन जडले. ‘बॉबी’ या चित्रपटादरम्यान ऋषी डिंपलच्या प्रेमात पडले होते. ऋषीला डिंपलशी लग्न करायचे होते, परंतु राजकपूर यांना हे लग्न मान्य नव्हते. त्यानंतर ऋषीने नितू सिंग यांच्याशी विवाह केला. मात्र लग्नानंतरही त्यांचे इतर अभिनेत्रींशी नाव जोडले जाऊ लागले. अभिनेत्री दिव्या भारतीसोबत ‘दिवाना’ या चित्रपटाची शूटिंग करीत असताना दिव्या आणि त्यांच्यात प्रेमप्रकरण बहरत असल्याची चर्चा रंगू लागली. पुढे ही चर्चा संपत नाही तोच ऋषीचे नाव जुही चावला हिच्याशी जोडले गेले. जेव्हा ही चर्चा नितू सिंग यांच्या कानावर पडली तेव्हा त्या चांगल्याच संतापल्या होत्या. असे म्हटले जाते की, त्यावेळी त्या ऋषीच्या या स्वभावामुळे त्रस्त होऊन घर सोडून निघून गेल्या होत्या. मात्र ऋषीनेच त्यांची समजूत काढून त्यांना घरी परत आणले होते.