Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘तैमूर’वर कमेंट करणाºया लोकांवर भडकले ऋषी कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 21:51 IST

करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या बाळाच्या नावावर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. सैफिनाने आपल्या बाळाचे ‘तैमूर’ ...

करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या बाळाच्या नावावर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. सैफिनाने आपल्या बाळाचे ‘तैमूर’ हे नाव जाहीर केल्यापासून नव नवीन कथांना जन्म दिला जात आहे. प्रत्येकच जण यावर आपली क मेंट देण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसते. अशावेळी ट्विटरवर अ‍ॅक्टिव्ह असलेले ऋषी कपूर कसे मागे राहतील. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या नातवाच्या नावावर कमेंट करणाºयांना चांगलेच सुनावले. सध्या त्यांचे हे ट्विट चागलेच गाजत आहे. करिनाने बाळाला जन्म दिल्यावर सैफ व करिनाचे अभिनंदन करणारे ट्विट ऋ षी कपूर यांनी पोस्ट केले होते. या ट्विट सोबतच करिनाच्या तब्येतीची माहिती त्यांनी दिली होती. करिनाचे बाळ गोंडस असल्याचाही उल्लेख ऋ षी कपूर यांनी केला होता. करिना व सैफच्यावतीने आभार मानत तुमच्या शुभेच्छा मी दोघांपर्यंत पोहचवेन असेही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले होते. मात्र यानंतर ट्विटरवर करिना व सैफच्या मुलाच्या नावावरून चांगलीच चर्चा रंगली यात काही दिग्गजांनी उडी घेतल्याने तैमूर हा ट्रेन्ड ट्विटरवर आला होता. यातच ऋ षी कपूर यांनी करिना व सैफच्या बाळाच्या नावावर सुरू असलेल्या वादावर कडक प्रतिउत्तर दिले. ऋ षी कपूर यांनी आपल्या पहिल्या ट्विट पोस्टमध्ये प्रतिउत्तर देताना लिहले, आई-वडिलांनी आपल्या मुलाचे काय नाव ठेवावे यावर तुम्हा लोकांना कोणता त्रास आहे? तुम्ही आपल्या कामाशी काम ठेवा, तुमचे याच्याशी काहीच देणे घेणे नाही, ही आई-वडिलांची मर्जी असेल. ऋ षी कपूर हे करिना कपूरचे काका आहेत. आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीविषयी कमेंट होत असल्याने त्यांचा राग अनावर झाला, त्यांनी लिहले, तुम्ही आपल्या कामाशी काम राखा, तुमच्या मुलाचे नाव तर नाही ठेवले ना! तुम्ही कोण होता यावर कमेंट करणारे!