Join us

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 06:48 IST

ऋषी कपूर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बुधवारी दक्षिण मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई: प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बुधवारी रात्री दक्षिण मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी नितू सिंग आहेत. त्यांचे बंधू रणधीर कपूर यांनी ऋषी कपूर यांची प्रकृती खालावल्याची माहिती दिली आहे. रणधीर कपूर म्हणाले, हे खरे आहे की ऋषी कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते सध्या सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात आहेत. तब्येत खाल्यावल्यामुळे आम्ही त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. ऋषी कपूर वेंटिलेटरवर असल्याची अनेकांनी विचारणा केली असता रणधीर कपूर यांनी ते वृत्त फेटाळून लावलं आहे. तसेच ऋषी कपूर यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टर त्यांच्यावर योग्य उपचार करत असल्याचंही रणधीर कपूर यांनी सांगितलं आहे. 2018ला कर्करोगावरील उपचारासाठी ऋषी कपूर अमेरिकेला गेले होते. तेथे 11 महिने उपचार घेतल्यानंतर ते मुंबईला परतले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे आज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :ऋषी कपूर