Join us

-आणि अचानक ऋषी कपूर यांनी आळवला वेगळाच सूर; रणबीर कपूरवर वाढला दबाव!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 10:18 IST

करिअरसोबतचं रणबीरने घर, संसार, कुटुंब यालाही प्राधान्य द्यावे आणि योग्यवेळी योग्य ते निर्णय घ्यावेत, असे ऋषी कपूर यांचे मत दिसतेय.

कालपरवाच ‘संजू’ रिलीज झाला आणि सगळीकडे रणबीर कपूर या एकाच नावाची चर्चा रंगली. या चित्रपटातील रणबीरच्या कामाचे वारेमाप कौतुक झाले. अर्थात अजूनही हे कौतुक थांबलेले नाही. बॉक्सआॅफिसवरही या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरु आहे. पण हे काय? इकडे ‘संजू’ रिलीज झाला आणि तिकडे रणबीरचे पापा ऋषी कपूर यांनी वेगळाच सूर लावला. होय, ऋषी कपूर यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे. हे ट्विट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यात त्यांनी रणबीरला पुन्हा एकदा फैलावर  घेतले. केवळ रणबीरलाचं नाही तर त्यांचा बेस्ट फ्रेन्ड अयान मुखर्जी यालाही ऋषी यांनी फैलावर  घेतले. आता कशासाठी, हे तर तुम्हाला कळायलाचं हवे. तर लग्नासाठी. 

 

होय, लग्नासाठी! ‘ रणबीर आणि त्याचा अतिशय जवळचा मित्र अयान मुखर्जी यांनी लग्नाबद्दल विचार करावा, ती वेळ आता आलीय,’ असे ट्विट ऋषी कपूर यांनी केले आहे.एकंदर काय तर ऋषी यांना आपल्या मुलाच्या लग्नाची घाई झाली आहे. त्यांच्या या ताज्या ट्विटने ही गोष्ट पक्की आहे. करिअरसोबतचं रणबीरने घर, संसार, कुटुंब यालाही प्राधान्य द्यावे आणि योग्यवेळी योग्य ते निर्णय घ्यावेत, असे त्यांचे मत दिसतेय.तूर्तास रणबीर कपूर आलिया भट्टला डेट करत असल्याच्या बातम्या आहेत. रणबीर व आलियाने हे नाते अधिकृत मान्य केलेले नाही. पण रणबीरच्या कुटुंबाला आलिया पसंत आहेत, याचे संकेत मात्र गेल्या काही दिवसांपासून मिळत आहेत. गेल्या काही दिवसांत आलिया अनेकदा रणबीरच्या कुटुंबासोबत दिसली आहे. अगदी अलीकडे आलिया ऋषी कपूर यांनाही भेटल्याचे समजते. सांगायचे तात्पर्य म्हणजे, येत्या दिवसांत रणबीरने लग्न करावे, यासाठीचा त्याच्यावरचा दबाव वाढला आहे. आता रणबीर हा दबाव झुगारून लावतो की, घरच्यांची मर्जी राखत लवकरात लवकर लग्न करतो, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे,

 सध्या रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बिझी आहे. यात तो आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल.

 

टॅग्स :रणबीर कपूर