Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋषी कपूर श्रीदेवींना ओळखेनात! युजर्स म्हणाले, तुमचे वय झाले राव!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 17:20 IST

ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केली. पण ही व्हिडिओ क्लिप कुठल्या चित्रपटाची आहे आणि यात त्यांच्यासोबतची हिरोईन कोण आहे, हे ते ओळखू शकले नाहीत. 

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या बॉलिवूड कलाकारांमध्ये ऋषी कपूर यांचे नाव सगळ्यांत वरचे म्हणता येईल. पण त्याचे हे सक्रिय असणे बरेचदा वाद ओढवून घेणारे ठरते. आपल्या स्पष्ट आणि ठोस वक्तव्यामुळे ते अनेकदा ट्रोल झालेत. ताजा प्रसंगही असाच. यावेळी ऋषी कपूर यांनी चक्क दिवंगत सुपरस्टार श्रीदेवींना ओळखण्यास नकार दिला आणि मग काय, ते चांगलेच ट्रोल झालेत. ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केली. पण ही व्हिडिओ क्लिप कुठल्या चित्रपटाची आहे आणि यात त्यांच्यासोबतची हिरोईन कोण आहे, हे ते ओळखू शकले नाहीत. 

हा कुठला चित्रपट आहे? माझ्यासोबतही ही हिरोईनही ओळखू येत नाहीये, असे ट्विट त्यांनी केले. त्यांचे हे ट्विट पाहून युजर्सनी त्यांना फैलावर घेतले.

तुम्ही तुमच्यासोबत असलेल्या अभिनेत्रीला ओळखत नाही? आश्चर्यचं आहे. कदाचित तुमचे वय झालेय, असे एका युजरने म्हटले.

 

 एक युजर तर चांगलाच भडकला. तुम्ही श्रीदेवींना ओळखत नसाल तर एक तर तुमचा स्मृतीभ्रंश झालाय, नाही तर तुम्ही जरा जास्त घेतलीय, असे या युजरने म्हटले.  

 एका युजरने ऋषी यांची जोरदार फिरकी घेतली. ती अभिनेत्री श्रीदेवी आहे.पण तिच्यासोबतचा तो अभिनेता कोण, हे आम्ही ओळखते नाही, असा टोमणा एका युजरने ऋषी कपूर यांना मारला. ऋषी कपूर व श्रीदेवी यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. चांदनी, गुरूदेव, नागीन, बंजारा, कौन सच कौन झुटा अशा सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं आहे. 

टॅग्स :ऋषी कपूर