बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होतेय. हळूहळू त्यांचा चिरपरिचित अंदाजही दिसू लागला आहे. ताजे ट्वीट वाचल्यानंतर तुम्हालाही हे पटेल. ऋषी कपूर कायम ट्रेंडिंग टॉपिक्सवर आपले विचार मांडतात. सोशल मीडियावरचे त्यांचे मजेशीर ट्वीट अनेकांचे मनोरंजन करतात. आता त्यांचे असेच एक मजेशीर ट्वीट चर्चेत आले आहे.होय, वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर होताच ऋषी कपूर यांनी एक ट्वीट केले आणि त्यांच्या या ट्वीटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ट्वीटरवर वर्ल्डकपसाठी निवड झालेल्या भारतीय क्रिकेटपटूंचे फोटो शेअर करत त्यांनी एक अनोखे निरीक्षण नोंदवले. ‘ हा फोटो रेफरन्स प्वॉइंट म्हणून घेऊ नका. पण आपले बहुतांश खेळाडू स्पोर्टस बीयर्ड (दाढी) का ठेवतात? सर्व सॅमसन(आठवते त्याच्या केसात किती शक्ती होती.) निश्चितपणे क्रिकेटपटू याशिवायही स्मार्ट आणि डॅशिंग दिसतात. जस्ट अॅन आॅब्जर्व्हेशन...,’ असे ऋषी कपूर यांनी लिहिले आहे. (ऋषी कपूर यांनी क्रिकेटची तुलना प्राचीन इस्रायली न्यायाधीश सॅमसन यांच्यासोबत केली आहे. त्याच्या केसात त्यांची शक्ती होती.)
वर्ल्ड कपची टीम अन् ऋषी कपूर यांचे Just an observation!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 14:50 IST
बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होतेय. हळूहळू त्यांचा चिरपरिचित अंदाजही दिसू लागला आहे.
वर्ल्ड कपची टीम अन् ऋषी कपूर यांचे Just an observation!
ठळक मुद्देऋषी कपूर यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांना कुठला आजार आहे,याचा खुलासा अद्यापही झाला नाही.