Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे लता दीदींच्या हातातलं बाळ? उत्तर वाचून पडाल चाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 10:33 IST

लता मंगेशकर यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

ठळक मुद्दे ऋषी कपूर लवकरच दीपिका पादुकोणच्या ‘द इंटर्न’ या सिनेमात दिसणार आहेत.

लता मंगेशकर यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या फोटोत त्यांच्या हातात एक बाळ दिसत आहे. हे बाळ कोण, तुम्ही सांगू शकता? कदाचित नाही. चला तर या बाळाचे नाव आम्ही तुम्हाला सांगतो.   लता दीदींच्या हातातलं हे बाळ बॉलिवूडमधील एका मोठया घराण्याचा वारस आहे. होय, कोण तर सुपरस्टार ऋषी कपूर.आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. खुद्द ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्विटरवर हा थ्रोबॅक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करताना ऋषी कपूर खूप भावूक झाले. ऋषी कपूर अवघ्या 3 महिन्यांचे होते, तेव्हाचा हा फोटो. 

‘नमस्कार लता जी. तुमच्या आशीवार्दाने मला आपला मी तीन महिन्याचा असतानाचा फोटो सापडला. तुमचा आशीर्वाद माझ्यावर नेहमीच राहिला आहे. धन्यवाद. मी हा फोटो ट्विटरवर शेअर करुन सर्वांना सांगू इच्छितो की हा फोटो माझ्यासाठी किती मौल्यवान आहे.,’असे त्यांनी हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.   ऋषी कपूर यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

 ऋषी कपूर लवकरच दीपिका पादुकोणच्या ‘द इंटर्न’ या सिनेमात दिसणार आहेत. हा सिनेमा हॉलिवूड सिनेमा ‘द इंटर्न’चा हिंदी रिमेक असणार आहे. या सिनेमात दीपिका व ऋषी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. दीपिकाच या चित्रपटाची प्रोड्यूसर आहे. अलीकडे ऋषी कपूर इम्रान हाश्मीसोबत ‘द बॉडी’ या सिनेमात दिसले होते. 

टॅग्स :ऋषी कपूरलता मंगेशकर