Join us

​अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर! ‘हे’ आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 10:28 IST

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर ट्विटरवर प्रचंड सक्रीय राहतात. स्वत:चे फोटो, व्हिडिओ, स्वत:चे विचार ते या माध्यमातून चाहत्यांशी शेअर करत ...

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर ट्विटरवर प्रचंड सक्रीय राहतात. स्वत:चे फोटो, व्हिडिओ, स्वत:चे विचार ते या माध्यमातून चाहत्यांशी शेअर करत असतात. अर्थात हे करत असताना ऋषी कपूर अनेकदा संतापतात, त्रागा करतात आणि लोकांच्या निशाण्यावरही येतात. पण गेल्या २३ दिवसांपासून ऋषी कपूर  ट्विटरपासून दूर होते. जाणीवपूर्वक त्यांनी हे अंतर राखले होते. पण  ट्विटरपासून दूर राहणे फार काळ त्यांना जमले नाही. होय, २३ दिवसांनंतर काल ऋषी कपूर पुन्हा एकदा  ट्विटरवर परतले.‘सर्वांना नमस्ते. मी २३ दिवसांनंतर  ट्विटरवर परततोय. तुम्हा सर्वांना मिस केले. तसेच भांडण आणि मस्तीही मिस केली,’ असे त्यांनी लिहिले. ते इथेच थांबले नाहीत तर त्यांनी पुन्हा एक  ट्विट केले.‘स्मार्टफोनला धोका...आधी आॅटोग्राफ होता, आता फोटोग्राफ. हे शोकजनक असू शकते,’असे दुसरे  ट्विट केले. या टि ट्विटसोबत त्यांनी एक फोटोही शेअर केला. यात टायटॅनिक जहाज समुद्रात डुंबतयं आणि लोक समुद्रातून त्याचे फोटो घेत आहेत. ‘टायटॅनिक २०१८ मध्ये डुंबले तर....’ असे या फोटोवर लिहिले आहे.ALSO READ : दादाजी, अब बस करो...! प्रिया प्रकाश वारियरवर भाळलेल्या ऋषी कपूर यांना लोकांनी दिला सल्ला!!आपल्या ट्विटमुळे ऋषी कपूर कायम वाद ओढवून घेत आलेत. या वादांमुळेच ट्विटरपासून दूर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.  ट्विटरवर अश्लिल व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल अलीकडे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर ट्रोलर्सवर इतके वैतागले होते की, त्यांनी त्यांना तंबीचं दिली होती. मला वा माझ्या कुटुंबाला कुणीही वेडेवाकडे बोलू शकत नाही. सोशल मीडियावर असो वा माझ्या पर्सनल लाईफमध्ये मला वाटते, तसाच मी राहणार,तसाचा वागणार आणि मनाला वाटते तेच लिहिणार, तेच बोलणार. कारण मला अभिव्यक्त होण्याचा पूर्ण अधिकार आहे. ही लोकशाही आहे आणि त्यामुळे मला वाटते तेच मी करणार. मी व्यक्तिश: कुणालाही लक्ष्य करत नाही. संवेदनशील विषयावर मी कधीही आंदोलन उभारले नाही. त्यामुळे माझ्याबद्दल कुणाला तक्रार असण्याचा प्रश्नच नाही. ट्रोलर्सला मी अजिबात भाव देत नाही. त्यांच्या शब्दांवर रिअ‍ॅॅक्ट होणे म्हणजे त्यांना नाहक महत्त्व देणे ठरते. त्यामुळे मी अशांची पर्वा करत नाही. तुम्ही ट्रोल करता तिथपर्यंत ठीक आहे. पण मला वा माझ्या कुटुंबाला तुम्ही जाहीरपणे शिव्या घालत असाल तर मी काहीही करणार नाही. केवळ अशांना ब्लॉक करेल. मला शिव्या घालणारे मला पाहू शकणार नाहीत, फॉलो करू शकणार नाहीत, हा त्याचा अर्थ होतो, असे ऋषी कपूर यांनी म्हटले होते.