Join us

ऋषी कपूर यांना शेवटपर्यंत होता या गोष्टीचा पश्चाताप, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 13:51 IST

ऋषी कपूर यांनी एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजविले होते.

ऋषी कपूर यांनी एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजविले होते. ३० एप्रिल २०२० ला ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. त्याआधी दोन वर्षं अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये ते भारतात परतले होते. त्यानंतर मार्चमध्ये त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचे निधन झाले. ऋषी कपूर यांच्या निधनाचा त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले होते.

ऋषी कपूर यांचा स्वभाव कधीच कुणापासून लपला नाही. असभ्य वर्तणूक आणि बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे बऱ्याचदा ते चर्चेत यायचे. ऋषी कपूर कधी कधी होणाऱ्या आपल्या भावनिक उद्रेक व कडकपणासाठी देखील ओळखले जायचे. मात्र मृत्यूच्या काही वर्ष आधी त्यांच्या स्वभावात झालेला बदल दिसू लागला होता. ते अधिकच शांत आणि लाघवी झाले होते. बऱ्याचदा त्यांनी मुलगा रणबीर सोबतच्या संबंधांबद्दल होणारा पश्चाताप देखील व्यक्त केला होता. शेवटपर्यंत त्यांना या गोष्टीचा पश्चाताप झाला होता. 

ऋषी कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'मला माहित आहे की मी माझ्या मुलाबरोबरचे संबंध खराब केले आहेत. माझी पत्नी नेहमीच मला या गोष्टीवरून टोकत असते की मी सुद्धा असे वागलो. आता कोणताही बदल करण्यास उशीर झाला आहे.

रणबीर आणि मी दोघेही नात्यातील नवीन बदलांसोबत एकमेकांना स्वीकारू शकणार नाही. हे आमच्या दरम्यानच्या असलेल्या एखाद्या काचेच्या भिंतीसारखे आहे. ज्यामधून आम्ही दोघे एकमेकांना पाहू शकतो, एकमेकांशी बोलू शकतो, पण यापेक्षी अधिक काहीच करू शकत नाही.'

टॅग्स :ऋषी कपूररणबीर कपूर