Join us

ऋषी कपूरने वाहिली वडिलांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 15:50 IST

अभिनेता ऋषी कपूरने आपले वडील राज कपूर यांना त्यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. ६३ वर्षीय ऋषीने आपले ट्विटर ...

अभिनेता ऋषी कपूरने आपले वडील राज कपूर यांना त्यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. ६३ वर्षीय ऋषीने आपले ट्विटर हँडल ‘रहेंगे सदा’ या नावाने बदलले. मेरा नाम जोकर या चित्रपटातील राज कपूर यांच्या ‘जीना यहाँ मरना यहाँ’ या गाण्यातील हे शब्द आहेत. राज कपूर यांचे २ जून १९८८ रोजी अस्थमाच्या आजाराने निधन झाले होते. ऋषीने ट्विटरवर आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहताना म्हटले की, राजकपूर. माझे वडील. अलविदा, मी २८ वर्र्षे पाठीमागे गेलो. माझ्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी मला मिळाल्या. त्यांचा पुत्र म्हणून मला अभिमान वाटतो.’राज कपूर हे शो मॅन म्हणून प्रसिद्ध होते. आवारा, श्री ४२०, बुट पॉलिश, संगम सारखे चित्रपट त्यांनी बनविले.