Join us
Daily Top 2Weekly Top 5

​नीलच्या लग्नात ऋषी कपूर-नितीन मुकेश यांची रंगतदार जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 20:24 IST

नीलच्या लग्नात हजर असलेल्या ॠ षी कपूर यांनी ‘मै शायर तो नही’ हे गाणे गात लाईव्ह परर्फाम्स दिला. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचा चार्मिंग हिरो अशी ओळख असलेला अभिनेता नील नितीन मुकेश गुरुवारी बोहल्यावर चढणार आहे. नील आणि त्याची मंगेतर रूक्मिणी सहाय दोघेही लग्नाच्या बेडीत अडकतील. उदयपूर येथे हा ग्रॅण्ड लग्न सोहळा होणार आहे. दरम्यान या लग्नासाठी बॉलिवूड कलावंतानी हजेरी लावली आहे. नीलच्या लग्नात हजर असलेल्या ॠ षी कपूर यांनी ‘मै शायर तो नही’ हे गाणे गात लाईव्ह परर्फाम्स दिला. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. उदयपूर येथे होत असलेल्या नील नितीन मुकेशच्या लग्न सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलावंत हजेरी लावत आहेत. गायक मुकेश यांचा नातू व गायक नितीन मुकेश यांचा मुलगा नीलचे लग्न संगीतमय मेजवाणी ठरला आहे. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवरही मुकेश यांनी गायलेल्या गाण्याच्या ओळी लिहल्या आहेत. नीलने आपल्या लग्नाच्या प्रत्येक सोहळ्यापूर्वी रूक्मिनीला गाणे गात प्रपोज केले आहे. अतिशय संगीतपूर्ण ठरलेल्या या सोहळ्यात  अभिनेते ऋषी कपूर यांनी हजेरी लावली. बिनधास्त ऋषी कपूर आपल्या मित्राच्या मुलाच्या लग्नात मागे कसे राहतील. या संगीतमय लग्न सोहळ्यात ऋषी कपूर यांनीही आपल्या आवाजाची जादू दाखविली. ऋषी कपूर यांच्या १९७३ साली रिलीज झालेल्या पहिल्या चित्रपटातील ‘मै शायर तो नही’ हे गाणे गात सूर लावला. ऋषी कपूरला साथ देण्यासाठी नितीन मुकेश यांनीही पुढाकार घेतला. नितीन मुकेश यांनी ‘डम डम डिगा डिगा’ हे गाणे गायले. दोघांची जुगलबंदी चांगलीच रंगली. या जुगलबंदीचा व्हिडीओ सध्या यू-ट्युबवर चांगलाच व्हायरल होत आहे.  रूक्मिणी ही नीलच्या आई-वडिलांची पसंती आहे. नील हा सुप्रसिद्ध गायक मुकेश यांचा नातू आहे. नीलचे पापा नितीन मुकेश हेही गायक आहे. मात्र नीलने आजोबा वा पापाच्या मार्गावर न जाता वेगळी वाट चोखाळली.