Join us

सारा अली खानच्या या वागण्याने भारावले ऋषी कपूर; म्हणाले, Wonderful Sara!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 13:28 IST

अभिनेत्री सारा अली खान हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. आज ती बॉलिवूड स्टार म्हणून ओळखली जाते. ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी सगळे काही तिच्या वाट्याला आले. पण असे असली तरी साराचे पाय अद्यापही जमिनीवर आहेत.

ठळक मुद्दे लवकरच सारा  इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात दिसणार आहे.

अभिनेत्री सारा अली खान हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. आज ती बॉलिवूड स्टार म्हणून ओळखली जाते. ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी सगळे काही तिच्या वाट्याला आले. पण असे असली तरी साराचे पाय अद्यापही जमिनीवर आहेत.  हसतमुखाने आणि तितक्याच नम्रपणे सर्वांना विश करणारी, कधीही फटकून न वागणारी शिवाय अन्य बॉलिवूड स्टार्ससारखे ‘अटिट्यूट’ न देणारी अभिनेत्री अशी साराची ओळख बनली आहे. काल-परवा सारा मुंबईच्या एअरपोर्टवर दिसली. ती सुद्धा स्वत:च्या लगेज बॅग्स स्वत:च घेऊन. तिला असे स्वत:च्या लगेच बॅग्स स्वत:च घेऊन जाताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. अनेकांनी तिचे कौतुक केले. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनाही साराला असे पाहून अभिमान वाटला. त्यांनी लगेच तिला शाबासकी दिली.

‘शानदार सारा. सेलिब्रिटींनी विमानतळावर कसे वागायला हवे, याचा जणू ते आदर्श घालून दिलास. स्वत:चे सामान स्वत: उचलण्यात कुठलाही कमीपणा नाही. रिसीव्ह करण्यासाठी ना ‘चमचा’ हवा, ना डोळ्यांवर काळा गॉगल. तुझ्यात अजिबात असुरक्षितता नाही, हे तू तुझ्या कृतीतून दाखवून दिले आहेस. नेहमी अशीच राहा,’असे त्यांनी लिहिले.

अनेक चाहत्यांनीही साराचे कौतुक केले.  स्टार सुद्धा स्वत:चे काम स्वत: करू शकतात, हे तू सिद्ध केलेस. कारण अनेक स्टार्स स्वत:ला सामान्यांपेक्षा वेगळे समजतात. तू मात्र याला अपवाद ठरलीस, असे एका युजरने लिहिले.  सारा, तू खरोखरच सच्ची व्यक्ति आहेस. तुझ्यात ना स्टार किड असल्याचा अहंकार आहे,ना स्टार असल्याचा दिखावा, असे अन्य एका युजरने लिहिले.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे तर लवकरच सारा  इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात दिसणार आहे. यात कार्तिक आर्यन तिचा हिरो असेल. हा सिनेमा 2009 मध्ये प्रदर्शित सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘लव्ह आज कल’चा सिक्वेल आहे. 2020 मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर सारा आणि कार्तिकचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

टॅग्स :सारा अली खानऋषी कपूर