Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हम तुम' साठी ऋषी कपूर यांनी दिला होता नकार, कुणाल कोहलीने कसं मन वळवलं? म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:55 IST

दिग्दर्शक कुणाल कोहलीने सांगितला किस्सा

सैफ अली खान आणि राणी मुखर्जीचा 'हम तुम' (Hum Tum) सिनेमा आजही तरुणांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. या रोमकॉम सिनेमात अभिनेते ऋषी कपूर यांचीही भूमिका होती. यात ते शायर होते आणि सैफ अली खानच्या वडिलांच्या भूमिकेत होते. त्यांचा सैफच्या आईसोबत घटस्फोट झालेला दाखवण्यात आला आहे. सिनेमात ऋषी कपूर यांची थोड्यावेळासाठीच भूमिका होती. म्हणून त्यांनी सिनेमा नाकारला होता. मग ते कसे तयार झाले याचा खुलासा दिग्दर्शक कुणाल कोहलीने (Kunal Kohli) केला आहे.

एका पॉडकास्टमध्ये कुणाल कोहली म्हणाला, "ऋषी कपूर यांना हम तुम ची ऑफर दिली तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया मी करणार नाही अशीच होती. कारण विचारल्यावर ते म्हणाले होते की पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे, काय आहे हे सगळं बकवा..सातच सीन दिलेत तु मला. मी नाही करणार हे"

कुणाल कोहली पुढे म्हणाला, "मग मी सिनेमातले सीन्स आणखी वाढवले. असं करत मी ऋषी कपूर यांचं मन वळवलंच. तेव्हा ऋषी कपूर म्हणाले, 'हे मस्त आगे. मला आणखी काही सीन्स द्या. मी गेस्ट अपिअरन्स का करु?' तेव्हा मी म्हणालो की मी सीन्स अजून वाढवेन पण तुम्ही सीनमध्ये उगाचाच फिरत इकडे तिकडे फिरत बसाल.तुम्ही ज्या सीनमध्ये याल तेव्हा याचा प्रभाव जाणवेल. 

टॅग्स :ऋषी कपूरबॉलिवूडसैफ अली खान