Join us

‘बेबो’ करिना कपूरचे ‘टायमिंग’ चुकले!! भडकलेल्या युजर्सनी करून दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 14:27 IST

करिना ट्रोल!!

ठळक मुद्देऋषी कपूर यांच्या निधनानंतर करिनाने त्यांचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन होऊन तीन दिवस झालेत. पण अद्यापही बॉलिवूडमध्ये शोकाकूल वातावरण आहे. आपला आवडता स्टार गमावल्याने चाहते दु:खी आहेत. मात्र याचदरम्यान करिना कपूरने सोशल मीडियावर तैमूरचा फोटो शेअर केला. तसे या फोटोत वाईट काहीही नाही. पण फोटो शेअर करण्याचा टाईमिंग पाहता, सध्या करिना ट्रोल होतेय.करिनाने इन्स्टाग्रामवर सैफ अली खान आणि तैमूरचा फोटो शेअर केला आहे. फोटोत सैफ तैमूरची हेअरकट करतोय. हा फोटो शेअर करताना करिनाने विनोदही केला आहे. 

 ‘आणखी कुणाला हेअरकट करायचीये?’ असे तिने गमतीने कॅप्शनमध्ये लिहिलेय. करिनाने हा फोटो शेअर केला आणि युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले. काही दिवसांपूर्वीच कपूर कुटुंबातील एका सदस्याचे निधन झाले असताना करिनाला विनोद सुचतोय म्हटल्यावर युजर्सनी बेबोला अनेक गोष्टी सुनावल्या.

तुझ्या कुटुंबातील एका कुटुंबाचे तीन दिवसांपूर्वीच निधन झाले असताना तुला विनोद कसा सुचू शकतो? असे एका युजरने बेबोला उद्देशून लिहिले. अन्य युजर्सनही करिनाला ऋषी कपूर यांच्या दु:खद निधनाचे स्मरण करून दिले.

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर करिनाने त्यांचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता. ऋषी यांचा क्रिकेटर मन्सूर अली खान अर्थात सास-यासोबतचा फोटो शेअर करत दोघांनाही तिने ‘टायगर’ संबोधले होते.

टॅग्स :करिना कपूरऋषी कपूर