Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बेबी राहा अगदी तुमच्यासारखी आहे", ऋषी कपूर यांच्या वाढदिवशी लेक रिद्धिमाची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 11:01 IST

Rishi Kapoor Birthday : ऋषी कपूर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त लेक रिद्धिमा कपूरने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनयाने एक काळ गाजवणारे ऋषी कपूर आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. बॉलिवूडच्या या हँडसम अभिनेत्यावर अनेक अभिनेत्री फिदा होत्या. ७०-८०चं दशक गाजवलेल्या ऋषी कपूर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त लेक रिद्धिमा कपूरने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

रिद्धिमाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिची लेक समायरा आणि ऋषी कपूर यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ऋषी कपूर आणि समायरा बर्थ डे सेलिब्रेट करताना दिसत आहेत. या फोटोला रिद्धिमाने खास कॅप्शनही दिलं आहे. "हॅपी बर्थडे पापा...तुम्ही इथे असता तर आज तुमच्या दोन्ही नातींसोबत बर्थडे सेलिब्रेट केला असता. तुमची बंदरी सॅम आता मोठी झाली आहे आणि बेबी राहा खूप क्यूट आहे. ती अगदी तुमच्यासारखी आहे. तुमच्याबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण मी सेलिब्रेट करते. आम्हाला तुमची खूप आठवण येते. तुमच्यासाठी आमचं प्रेम दिवसेंदिवस वाढत चाललं आहे", असं कॅप्शन या फोटोला तिने दिलं आहे. 

रिद्धिमाबरोबरच नीतू कपूर यांनीदेखील ऋषी कपूर यांच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली आहे. नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचे जुने फोटो शेअर केले आहेत. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून कित्येक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलेल्या ऋषी कपूर यांचं ३० एप्रिल २०२० रोजी निधन झालं. पण, आजही लोकांच्या मनातील त्यांचं स्थान कायम आहे. 

टॅग्स :ऋषी कपूररिद्धिमा कपूरनितू सिंग