Join us

'दारू कमी पित जा' चिंटूजी म्हणत ऋषी कपूर यांच्यावर नेटक-यांनी साधला निशाणा, या कारणामुळे झाले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 19:22 IST

कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात आणीबाणी घोषित व्हावी. पण सोशल मीडिया यूजर्सना त्यांचे म्हणणे काही पटले नाही त्यांनी ऋषी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

सध्या सर्वत्रच लॉक डाऊन असल्यामुळे प्रत्येकाला सोशल मीडियाचा आधार मिळाला आहे. त्यात आपली मतं मांडण्यासाठी सोशल मीडिया एक उत्तम माध्यम समजलं जातं. त्यात आता सेलिब्रेटी विविध गोष्ट करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय. यात मात्र सर्वाधिक सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारे ऋषी कपूर यांच्यावर पुन्हा नेटक-यांनी निशाणा साधला आहे. अर्थात ऋषी कपूर यांना ट्रोल करण्याची काही ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील प्रत्येक विषयावर आपले मत व्यक्त करतात आणि ते ट्रोल होतात.  मुळात ऋषी कपूर कोणत्याच विषयावर मत मांडताना कसलाच विचार करत नाहीत. अगदी त्याचप्रमाणे त्यांनी पुन्हा एकदा बिनधास्त त्यांचे मतं मांडण्यास सुरूवात केली. 

मात्र ऋषी कपूर यांचे विचारसरणी पाहता नेटीझन्सने नेहमी आपले मतं मांडणे गरजेचे आहे का? असा प्रश्नच ऋषी कपूर यांना केला आहे. यावेळी त्यांनी  ट्वीट करत त्यांचे मत मांडले मात्र नेहमीप्रमाणे  हे ट्वीट नेटक-यांना चांगलंच खटकलं. त्यानंतर ऋषी कपूर जोरदार ट्रोल झाले. त्यांनी ट्वीट करत लिहीले होते की, कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात आणीबाणी घोषित व्हावी. पण सोशल मीडिया यूजर्सना त्यांचे म्हणणे काही पटले नाही त्यांनी ऋषी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

एका यूजरने लिहिले की, अल्कोहोलमुळे तुमच्या मेंदूवर परिणाम झाला आहे, रिलॅक्स व्हा आणि आराम करा.एका यूजरने ऋषी कपूर यांना सल्ला दिला आणि सांगितले- कमी दारु प्या. काही ट्रोलर्स ऋषींना म्हणाले, चिंटू जी तुम्ही पेग घ्या आणि आराम करा. 

टॅग्स :ऋषी कपूरमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस