Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाणगंगेच्या घाटावर ऋषी कपूर यांच्या अस्थि कलशाचे विसर्जन; रणबीर, नीतू, रिद्धिमासह दिसली आलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 10:47 IST

रणबीरने पित्याच्या अस्थिंचे बाणगंगेत विसर्जन केले.

ठळक मुद्दे 30 एप्रिल रोजी ऋषी कपूर यांनी अंतिम श्वास घेतला. यावेळी त्यांची मुलगी रिद्धिमा दिल्लीत होती

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गेल्या 30 एप्रिलला दु:खद निधन झाले. काल रविवारी मुंबईच्या बाणगंगेत त्यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले.  ऋषी यांच्या पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर, मुलगी रिद्धिमा कपूर शिवाय आलिया भट आणि अयान मुखर्जी सगळे बाणगंगेच्या घाटावर पोहोचलेत. यावेळी सर्वांच्या तोंडावर मास्क होता़. यावेळी रणबीरने पित्याच्या अस्थिंचे बाणगंगेत विसर्जन केले.

ऋषी यांची लेक रिद्धिमा लॉकडाऊनमुळे पित्याच्या अंत्यदर्शनाला पोहोचू शकली नव्हती.   29 एप्रिल रोजी ऋषी कपूर यांची अचानक  तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.

दुस-या दिवशी 30 एप्रिल रोजी त्यांनी अंतिम श्वास घेतला. यावेळी त्यांची मुलगी रिद्धिमा दिल्लीत होती. लॉकडाऊनच्या स्थितीत तिला रस्ते मार्गाने येण्याची परवानगी देण्यात आली होती. रस्ते मार्गे हजारो किमीचा प्रवास करून शनिवारी रात्री उशीरा रिद्धिमा मुंबईत पोहोचली.  ती आल्यानंतर ऋषी कपूर यांच्या प्रार्थना सभेचे आयोजन केले गेले. 

या प्रार्थनासभेत एकूण केवळ सहा लोकच सहभागी होऊ शकलेत. या प्रार्थना सभेचा एक फोटो समोर आला होता. यात नीतू व रणबीर दोघेही दिसले होते. प्रार्थनासभेनंतर बाणगंगेच्या घाटावर ऋषी यांच्या अस्थिकलशाचे विधीवत विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी घाटावर एक पूजा करण्यात आली.

 

टॅग्स :ऋषी कपूररणबीर कपूरआलिया भट