Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋषी कपूर यांनी पुन्हा केले वादग्रस्त ट्वीट,चक्क महिलेलाच दिले अश्लिल भाषेत उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2017 19:59 IST

नेहमा ट्वीटरवर ऋषी कपूर कोणत्या ना कोणत्या विषयांवर आपले परखड मत मांडताना दिसतात.त्यांच्या ट्वीटवर अनेकजण त्यांना संमिश्र प्रतिक्रीया देताना ...

नेहमा ट्वीटरवर ऋषी कपूर कोणत्या ना कोणत्या विषयांवर आपले परखड मत मांडताना दिसतात.त्यांच्या ट्वीटवर अनेकजण त्यांना संमिश्र प्रतिक्रीया देताना दिसतात.नुकतेच ऋषी कपूर यांनी करिना कपूर खान आणि सौफअली खानचा बेबी तैमूरचे नावावर अनेकांनी आपले मत मांडले होते. त्यावेळीही ऋषी कपूर यांनी ट्वीटवर याविषयांवर उत्तर देत चांगलेच सुनावले होते. करिना आणि सैफने त्यांच्या मुलाचे नाव काय ठेवावे?काय ठेऊ नये? कसे ठेवावे हा त्यांचा खाजगी प्रश्न आहे.यांवर तुम्ही बोलणारे कोण? अशा शब्दांत खडसावले होते. आता पुन्हा एकदा ऋषी कपूर यांनी ट्वीटवर एका चाहत्याचा चांगलाच समाचा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. करण जोहरने तो पिता बनला असल्याची गोड बातमी दिली. अनेक बॉलिवूडची मंडळी करणला शुभेच्छा देत होते. तर दुसरीकडे ऋषी कपूर वेगळ्याच मुडमध्ये  होते.त्यांनी ट्विटरवर शॉर्ट क्विजमध्ये चाहत्यांना एक प्रश्न विचारला होता. माझ्या आणि करण जोहरमध्ये साम्य अथवा एकसारखं काय आहे? या प्रश्नावर त्यांना अनेक उत्तरे मिळाली.एका चाहत्याने उत्तर देताना म्हटले की, दोघानीही वडिलाचे नाव मुलाला ठेवले आहे. तर एका महिलेने त्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले की, सेलिब्रिटी असूनही मूर्खासारखे अंतर ठेवता, हे दोघामध्ये साम्य आहे. त्यानंतर ऋषी कपूर यांना राग अनावर झाला आणि त्या महिलेला उत्तर देताना अपमानास्पद आणि अश्लील ट्विट केले. यानंतर ऋषी कपूर यांनी अनेक वादग्रस्त आणि मजेदार ट्विट करत प्रत्येकाला त्यांच्याच भाषेत उत्तरे देण्यास सुरुवात केली. एका चाहत्याला तर त्यांनी चक्क ब्लॉकही केले.मात्र महिलेला दिलेल्या प्रत्युत्तारामध्ये अपमानास्पद आणि अश्लील ट्विट करत नव्या वादाला तोंड फोडले आहे हे मात्र नक्की.