Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋषीला नरकात जायचे नाहीये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 15:40 IST

अभिनेता ऋषी कपूर यांचे ट्वीट्स नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी निर्माता अनुराग बासूच्या एका ट्वीटला दिलेले उत्तर नेटिझिन्समध्ये चर्चेचा ...

अभिनेता ऋषी कपूर यांचे ट्वीट्स नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी निर्माता अनुराग बासूच्या एका ट्वीटला दिलेले उत्तर नेटिझिन्समध्ये चर्चेचा विषय बनले आहे. अनुरागचा ८ मेला वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाला ट्विटरवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या.यावर अनुरागने वाढदिवसाच्या दुसºया दिवशी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाºयांचे आभार आणि ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या नाहीत ते सगळे नरकात जावो असे म्हटले होते. त्यावर ऋषी कपूरने खूपच छान उत्तर दिले आहे. अनुरागची टर उडवण्यासाठी त्यांनी एक ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, बासू मी उशीर झाला असला तरी तुला शुभेच्छा देत आहे. कारण मला नरकात जायचे नाहीये.